बुटीबोरी पोलिस स्टेशनमध्ये बुटीबोरी, बेला व एमआयडीसी पोलिस : ठाण्यांतर्गत शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते. आगामी सण, उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना होऊ नये व कायदा आणि सुव्यवस्था राखून पोळा, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद हे सर्व सण शांततेत पार पाडावे, असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले. याप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संजय पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड, बुटीबोरीचे ठाणेदार भीमाजी पाटील, एमआयडीसीचे ठाणेदार महादेव आचरेकर, बेल्याचे अजित कदम यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, मशीद कमिटीचे मौलाना व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
