बुटीबोरी येथील पाच खेळाडूंची नेपाळ येथे होणाऱ्या International Karate Championship स्पर्धेसाठी निवड

ayansh tvs

दि. 21/05/2022 ला
टाकळघाट येथील शिंगारे सभागृह मधे नेपाळ येथे होणाऱ्या Internationl karate Championship या स्पर्धेसाठी निवड झालेल्या पाच खेळाडूंचा सत्कार समारोह पार पडला.
कार्यक्रमाला उपस्थित मुख्य
अतिथी म्हणून श्रीमती शारदाताई शिंगारे (सरपंच ग्रा.पं. टाकळघाट), प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नीलकंठजी चेटुले, श्री. सुधीरजी रिनके सर, श्री. निखिल भाऊ शिंगारे हे उपस्थित होते.

butibori

श्रीमती शारदाताई शिंगारे यांनी उपस्थित खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन करून खेळाडूंचे मनोबल वाढवले व शुभेच्छा व्यक्त केली.
व निवड झालेले खेळाडू समर कुमार, विशाल हिवरकर, नकुल चेटुले, आचल पाटील, नैतिक वनकर हे खेळाडू व त्यांच्या पालक वर्गाचा स्पोर्टस् किट देऊन सत्कार केला.
International karate Championship ही स्पर्धा नेपाळ येथील काठमांडू येथे दि. 25 ते 27 मे दरम्यान होणार आहे.
या स्पर्धेमध्ये भूटान, बांगलादेश,मलेशिया,श्रीलंका,नेपाळ व भारत या देशातील खेळाडू सहभागी होणार आहेत.