butibori

आई-वडिलांच्या उपकाराची परतफेड करणे शक्य नाही: राजबलसिंह चौहान

बुटीबोरी : जन्म देणाऱ्या जन्मदात्याच्या उपकाराची परत फेड करणाऱ्या सिडको कॉलनी बुटीबोरी मधील राजबलसिंह चौहान यांनी वडिलांच्या आजारपणात केलेल्या संघर्षाचे उदाहरण नक्कीच इतरांनी घ्यावे.रजबलसिंह चौहान यांचे वडील राजसिंह चौहान वय ९१ वर्ष यांचे दिनांक १९ फेब्रुवारी शनिवारला वृद्धापकाळाने,दीर्घ आजारपणा मुळे निधन झाले.aamchi butibori


गेल्या एक महीण्यापासून ते आजारी असता त्यांना नागपूर मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले.पण वयाची नव्वदवी गाठल्या नंतर सर्व शरीर उत्तर देत असत.आता यांना घरीच जी सेवा देऊ शकतात ती संपूर्ण परिवारातील सदस्यांनी द्यावी असे उत्तर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिले असता,मुलांनी मात्र हार मानली नाही जन्म देणाऱ्या वडिलांना वाचवीण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत शक्य ते प्रयत्न करण्याची तयारी करून त्यांना दिल्ली मधील अपोलो हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची तयारी केली परंतु वडिलांनी बुटीबोरी सोडून जाण्यास नकार दिला.


राजबलसिंह यांनी घरीच त्यांना लागणारे सर्व आवश्यक ते उपकरणे घरीच आणले.परिवारातील मोठा मुलगा अशोकसिंह मुलगी विमला देवी व सून मंजू यांनी दिवस रात्र एक करून तब्बल १५ दिवस त्याची सेवा केली.व पाहता पाहता त्यांचे आजारपण वाढले व १५ दिवसांनंतर वडिलांची प्राण ज्योत मावळली.त्यांची अंतिम इच्छा होती की माझ्या मृत्यू नंतर माझा अंतिम विधी माझ्या मूळ गावी करावा त्यांची ईच्छा पूर्ण करीत राजबलसिंह चौहान यांनी पार्थिव शरीरास दिल्ली जवळील खेडा भाऊ जिल्हा शामली उत्तरप्रदेश येथे आणले व येथील मोक्ष धाम वर त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला.त्यांच्या मागे दोन मुले,मुलगी,सून व नातवंड असा आप्त परिवार आहे.butibori midc today news

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *