
बुटीबोरीच्या विकासाचा ध्यास मनाशी बाळगणारे, जनसामान्यांच्या सुखदुःखात धावून जाणारे, प्रत्येक गरजवंताला मदतीचा हाथ देणारे व संपूर्ण बुटीबोरीकरांच्या काळजात घर करून राहणारे विकासपुरुष,

निडर नेते स्व. किशोरभाऊ वानखेडे यांच्या जयंतीनिमित्त स्व. किशोरभाऊ वानखेडे बहुउद्देशीय संस्था, बुटीबोरीतर्फे आज गुरुवारी आयोजित रक्तदान शिबिराला दात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्व. किशोरभाऊ वानखेडे यांनी बुटीबोरीच्या विकासाकरिता

व बुटीबोरीवासीयांसाठी केलेल्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुटीबोरी येथील प्रभाग क्रं. २, दुर्गा माता मंदिर येथे आयोजित या रक्तदान शिबिराला बुटीबोरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भीमाजी पाटील, नगरसेवक सनी चौव्हान, मंगेश आंबटकर, महेंद्र चौव्हान, दीपक गुर्जर, सुधाकर चटप प्रामुख्याने उपस्थित होते.

शिबिरात एकूण ८३ दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. यावेळी जीवनज्योती ब्लड बँकेच्या चमूने रक्त संकलन केल.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आकाशदादा वानखेडे, अयुब पठाण, विठ्ठल डाहूले, राजेश ताम्हणपुरे, फारुख शेख, नीलेश वानखेडे, जीवनज्योती ब्लड बँकेचे किशोर खोब्रागडे उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुमित मेंढे, महेश पटले, सचिन चंदेल, तुलेश ठाकरे, ऋषी जैस्वाल, अक्षय कुबेर, अंकित भोयर, विनोद मोहोड, दीपक बन, रुपेश इचकाटे, पाणी पुरवठा व मलनिस्सारण सभापती मंदार वानखेडे आदीनी मोलाचे सहकार्य केले.