महारोजगार भरती मेळाना आज

बुटीबोरी: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुटीबोरी व जिल्हा कौशल्य केंद्र नागपूर यांच्या संयुक्त सहकार्याने मंगळवारी (ता. २८) सकाळी अकरा वाजता महारोजगार भरती मेळाव्याचे आयोजन आयटीआय बुटीबोरी येथे करण्यात आले आहे.

मेळाव्याला मोठ्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्या दरम्यान कंपनीमध्ये उपलब्ध रोजगारीच्या संधीची उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना माहीती देण्यात येईल व मुलाखतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना रोजगारही देण्यात येईल.

तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी मंगळवारीजी सकाळी ठिक १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुटीबोरी येथे उपस्थित रहावे व रोजगाराच्या संधीच्या लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य के. जी. चांदेकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *