सातगाव (किन्हाळा) धम्मज्योती बुद्ध विहारात धम्मदेसना व सामाजिक प्रबोधन

बसपा माजी जिल्हा सचिव सतीश शेळके यांचे आयोजन

Butibori-महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या आचरणाकरीता आषाढ पौर्णिमा (धम्म चक्र पोर्णिमा) निमित्त शनिवार १६ जुलैला सातगाव (किन्हाळा ) धम्मज्योती बुद्ध बिहारात धम्मदेसना व सामाजिक प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.


बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हा सचिव सतिश शेळके यांच्या नेतृत्वात धम्मज्योती बुध्दविहारात आयोजित सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाला पुज्य भदंत धम्मानंद यांची धम्मदेसना व भारतीय बौध्द महासभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते यांनी सामाजिक प्रबोधन केले.

प्रमुख पाहुणे म्हणून सातगावचे उपसरपंच प्रविणा शेळके, अरविंद बोरकर, ज्ञानेश्वर सुके, रवींद्र वानखेडे, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन वैशाली पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता माला शेळके, करुणा मानवटकर, मंगला बोरकर, निलीमा भोंगाडे, प्रेमीला कांबळे, संगीता मेश्राम मिनाक्षी शेळके, हिना शेळके, अंतकलाबाई शेळके यशोदा कांबळे परिश्रम घेतले. सूत्रसंचालन स्फूर्ती पाटील यांनी तर उन्नती ढाकणे यांनी आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *