टाकळघाट : सातारा येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत नागपूर विभागातून एस. आर. कराटे अॅण्ड किक बॉक्सिंग क्लब, टाकळघाट येथील विद्यार्थी देवांशु दिलीप डबुरकर याने ३२ किलो वजन गटात प्रथम स्थान पटकाविले आहे.

याद्वारे त्याने नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. राज्यस्तरीय तेंगसुडो (मार्शल आर्ट) स्पर्धेत अनुज उमेश कावळे याने कांस्यपदक पटकावले. दोघांचेही टाकळघाट येथे रॅली काढून स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी हिंगणा पंचायत समिती सभापती सुषमा कडू-कावळे, टाकळघाट सरपंच शारदा ज्ञानेश्वर शिंगारे, उपसरपंच उमेश कावळे, ज्ञानेश्वर शिंगारे,

ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर कावळे, सदस्य वेदांत वासाड, दिलीप डबुरकर, निकेश वैरागे, निहाल वैद्य, धनंजय वणकर, मुख्य प्रशिक्षक सुधीर रिनके उपस्थित होते.