BUTIBORI/२६ नोव्हें:- तालुक्यातिल बोरखेडी (रेल्वे) येथील ग्रामपंचायत येथे संविधान दिनाचा ७३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच राजू घाटे हे होते.यावेळी भारतीय संविधानाचे ८५% बहुजन समाजाला असलेले योगदान,संविधानाची गरज व महत्व,संविधानाने सर्वसामान्य नागरिकांना दिलेले मौलिक अधिकार व कर्तव्याची जाणीव आपल्या अध्यक्षीय भाषणातून सरपंच राजू घाटे यांनी करून दिली.तत्पूर्वी राजू घाटे यांच्या हस्ते संविधानकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून वंदन करण्यात आले.त्यानंतर सर्व उपस्थितांनी सामूहिक संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले.यावेळी प्रामुख्याने ग्रा प सदस्य बंडू गोटे,कमलेश मुन,हरीश फंड,गुणवंत तेलंग,भास्कर मेहकुरे,रमेश झाकणेकर,सिंधुताई कांबळे,ज्ञानेश्वर निकुडे,सचिव शिवाजी काकडे ग्रा प कर्मचारी गणेश पाटील,सुधाकर पानघाटे,प्रणाली डंभारे आदी उपस्थित होते.