छत्रपति शिवाजी महाराज जयंती – जयकारे लगाते शिव सैनिक

प्रथमेश इंदुलकर यांच्या व्याख्यानात दंग झाली तरुणाई

बुटीबोरी महाराष्ट्राच्या :- शौर्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची बुटीबोरी शिवसेना व युवासेना संयुक्त विधिमने तर्फे शुक्रवार दि. १० मार्च रोजी तिथी नुसार जयंती साजरी करण्यात आली. साय ७ वा. जुना बँक ऑफ इंडिया चौक मध्ये कार्यक्रमांचे उद्घाटक बुटीबोरीचे पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील, प्रमुख पाहुणे वसंतराव बडनेरकर गुरुजी, अरविंदजी वाळके, प्रदीप डेरकर, यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे विधीप्रत पूजन करून हजारो शिवमावळ्यांचा जल्लोषात आणि आतिषबाजीच्या भव्य देखाव्यात कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

प्रथमेश इंदुलकर यांना ऐकण्याच्या संधीचे बुटीबोरी वसियानी सोने केले व शेकडोच्या संख्येने श्रोते उपस्थित होते.तरुणाईच्या मनावर अधिपत्य गाजवनारे प्रथमेश इंदुलकर यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द अंगावर शहारे उठवणारा होता.शिवरायांच्या बालपणाचे पराक्रम, युद्ध कैशल्याचे प्रसंग, ते अनेक कील्याना महाराजांनी बिकट परिस्थीती असताना कश्या प्रकारे हस्तगत केले यांचे सुंदर चित्र आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले. शिवप्रताप ढोल ताशा पथक, विदर्भ प्रांत नागपूर यांनी छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.

महाप्रसाद वितरीत करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख तुषार डेरकर, युवासेना अधिकारी आकाश इंगोले, रमेश ढोके, सभापती मनोज ढोके, नगरसेवक बबलु सरफराज शेख, वामनजी सातपुते, रामेश्वरजी भागवतकर, कडू काकाजी, सुनील किटे, प्रशांत झाडे, सद्दाम शेख, गणेश कडु, निलेश जुमडे, देवांनद वानखेडे, लक्ष्मण रघटाटे, प्रशांत सातपैसे, प्रतीक कोल्हे, अजय सरोदे, आशिष गादेवार, निखिल भोयर इत्यादि शिव सैनिक उपस्थीत होते.

शिवसेना तालुका अध्यक्ष तुषार डेरकर, यांनी सांगितले की दरवर्षी मोठ्या आतुरतेने शिवप्रेमी आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट बघत असतात. शिव जयंती ही ठराविक दिवसा पूर्ती मर्यादित नसून महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या प्रत्येकानी दर दिवशी हा जल्लोष साजरा करून महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजे. आज तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी होत असूनराज्यभरातील शिवभक्तांचा उत्साह अगदी गगनात झाला आहे. हजारो शिव मावळ्यांचे प्रेम असेच कायम राहो तसेच उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *