बुटीबोरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला

शाळेतर्फे विजयी संघाचा सत्कार.
बुटीबोरी : बुटीबोरीतील बालाजी कॉन्व्हेन्ट कनिष्ठ महाविद्यालय वॉलीबॉल संघाने १९ वर्षाखालील वॉलीबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक जिंकले आहे.या ऐतिहासिक यशामुळे बुटीबोरीतील क्रीडापटूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना मोठा सन्मान मिळाला आहे.तसेच,महाराष्ट्र राज्याच्या खो-खो संघाने ओपन कॅटेगरीत सुवर्ण पदक मिळवून बुटीबोरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे व सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मीनाताई ठाकरे इंडोर स्टेडियम नाशिक येथे ५ फरवरीला आयोजित १९ वर्षाखालील वॉलीबॉल स्पर्धेत कर्नाटक सोबत झालेल्या अंतिम सामन्यात दमदार खेळून रौप्य पदक मिळवले.संघाचे नेतृत्व कॅप्टन अनिकेत शर्मा,यांनी केले.त्यांच्यासह प्रिन्स द्विवेदी,कार्तिक झोडे,,रोहन गाईधनी,लक्ष ढिल्लन,चित्रांश जवादे,तनवीर शेख आणि निलेश निखडे, या खेळाडूंनी आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार केली.संघाच्या मेहनतीचा परिणाम म्हणून त्यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले आणि रौप्य पदक आपल्या नावावर केले.

तर दुसरी कडे खो-खो संघाचे सुवर्ण पदक आपले नाव कोरण्याकरिता राजस्थान सोबत झालेल्या सामन्यात उच्च कोटीच्या खेळाचे प्रदर्शन करीत
बुटीबोरीच्या तीन खेळाडूंनी महाराष्ट्राच्या खो-खो संघात सहभाग घेताना,ओपन कॅटेगरीत सुवर्ण पदक मिळवले. या खो-खो संघातील खेळाडू आकाश नंदा,प्रिन्स द्विवेदी आणि कार्तिक झोडे होते.त्यांच्या कठोर मेहनतीमुळे महाराष्ट्र संघाने पहिल्या स्थानावर आपले नाव कोरले.
संघाचे प्रशिक्षक आकाश प्रमोद नंदा यांनी खेळाडूंचे मार्गदर्शन केले.त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे खेळाडूंना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी आपल्या सर्वोत्तम क्षमतेचा उपयोग करून संघासाठी यश संपादन केले.
बुटीबोरीच्या वॉलीबॉल आणि खो-खो संघांनी दाखवलेली उत्कृष्टता सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. या संघाच्या यशामुळे क्रीडा क्षेत्रातील इतर खेळाडूंसाठी एक आदर्श निर्माण झाला आहे.भविष्यात या खेळाडूंना अधिक मोठ्या स्पर्धांमध्ये देखील यश मिळवून आणखी नाव कमवण्याची आशा आहे.
बुटीबोरीच्या वॉलीबॉल संघाने रौप्य पदक मिळवले,तर महाराष्ट्र संघात असलेल्या बालाजी कॉन्व्हेन्ट मधील खेळाडूंनी खो-खो मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले.या यशाने बुटीबोरीच्या क्रीडापटूंचा गौरव वाढवला आहे.त्यांच्या मेहनतीला सलाम आणि भविष्यात आणखी यश मिळवण्याच्या शुभेच्छा प्रथमेश नेऊलकर व प्राचार्य प्रवीण भोयर,यांनी दिले.
