गोदावरी नगर येथे लाडक्या बहिणींसाठी आत्मरक्षा शिबीर संपन्न

सतत तीन वर्ष बुटीबोरी मॅरेथॉन विजेत्या नूतन खोब्रागडे चा सत्कार; ग्रामपंचायत बोथली चा उपक्रम

बुटीबोरी: सध्या देशात सुरु असलेले महिलांवरील अत्याचार बघता तसेच देशातील असुरक्षित असलेल्या महिला बघता महिलांनी स्वतःचे स्वतःच आत्मरक्षण करावे म्हणून बोथली ग्रामपंचायतचे युवा उपसरपंच अरुण वानखेडे यांनी पुढाकार घेत महिलांना स्वतःचे आत्मरक्षण करता यावे म्हणून

बोथली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गोदावरी नगर येथे आज रविवार दि ८ सप्टेंबरला परिसरातील महिला व शालेय विध्यार्थिनी करिता, लाडक्या बहिणींकरिता आत्मरक्षा शिबीर घेण्यात आले.

ब्लॅक बेल्ट व कराटे प्रशिक्षक सुधीर रिनके सर व ग्रामपंचायत बोथली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आत्मरक्षा शिबिराला इंडियन नेव्ही मध्ये रुजू झालेल्या हर्षा भेलावे या मुख्य आकर्षण होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अरुण वानखेडे, ग्रा प सदस्य प्रकाश झुरमुरे, गणेश भरडे, स्वाती पाटील, ज्ञानेश्वरी बोजेवार, प्रमोद चौधरी,

संतोष कराळे, उमाकांत जवादे, जियालाल बोजेवार, देविदास पटले आदी उपस्थित होते. देशात घडलेले निर्भया, कलकत्ता बलात्कार प्रकरण, बदलापूर, डॉ पायल तडवी यासारख्या घटना समजसाठी फार घातक असून याची पुन्हा पुनरवृत्ती होऊ नये म्हणून आजच्या महिलांनी आत्मरक्षणाचे धडे घेणे फार गरजेचे आहे हीच बाब हेरून बोथली ग्रामपंचायत चे युवा उपसरपंच अरुण वानखेडे यांनी या लाडक्या बहिणासाठी आत्मरक्षण शिबिराचे आयोजन केले होते.

मुली जन्मल्या नंतर पाच सहा वर्षाच्या किंवा शाळेत जायला लागल्या कि त्यांच्या हातात मोबाईल न देता पुस्तकांसोबत लाठी काठी द्या, जेणेकरून त्या दांडीपट्टा खेळेल किंवा त्यांना आत्मरक्षणासाठी कराटे चे प्रशिक्षण द्या असे उदगार उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अरुण वानखेडे यांनी काढले.

यावेळी कराटे प्रशिक्षक सुधीर रिनके यांनी महिलांना आत्मरक्षण करण्यासाठी काय करावे या करिता विविध प्रत्यक्षिके करून दाखवीत उपस्थित महिलांकडून करून घेतली.

सोबतच जर आपल्यावर एकटे असतांना कुणी समाज विघातक व्यक्तीने हल्ला चढवीला तर समयसूचकता बाळगून त्यावर प्रतिहल्ला कसा करायचा याचे सुद्धा प्रात्यक्षिक करून दाखविले. सोबतच यावेळी सतत तीन वर्षापासून बुटीबोरी मॅरेथॉन दौड जिंकणारी नूतन खोब्रागडे हिचा सुद्धा आयोजकांनी सत्कार केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *