बुटीबोरी : जागतिक महिला दिनानिमित्त बुटीबोरी शहरात भव्य ‘आनंदी आनंद गडे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्व. किशोरभाऊ वानखेडे बहुउद्देशीय संस्था, लोकमत सखी मंच, महाकाली महिला फाउंडेशन, गायत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आई लॉन, बुटीबोरी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 3,000 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी इंदिरा चौधरी, म्हाडा नागपूरच्या कार्यकारी अभियंता दीप्ती काळे, कामगार कल्याण मंडळाच्या प्रतिभा भाकरे, नायब तहसीलदार ज्योत्स्ना खलाटे, तसेच पोलिस उपनिरीक्षक कुमुदिनी पाठोडे उपस्थित होत्या.

संस्कृती आणि मनोरंजनाची रंगतदार मेजवानी
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदना जैस्वाल यांनी स्वागत गीत सादर केले. Ris डान्स अकॅडमी व बंगाली महिला समिती यांनी उत्कृष्ट सांस्कृतिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. लोकमत सखी मंचतर्फे समाजप्रबोधनपर नाटिका सादर करण्यात आली, ज्यामुळे महिलांचे अधिकार, आत्मसन्मान आणि सामाजिक भान जागवले गेले.

महिला सशक्तीकरणाचा जागर
महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांनी मार्गदर्शन केले. महिलांसाठी खास खेळ आणि आकर्षक भेटवस्तूंची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे आनंदाचे वातावरण अधिकच रंगतदार झाले.

संयोजन आणि सहकार्य
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती सेनगुप्ता यांनी, प्रस्तावना रीता कुटे यांनी तर आभार प्रदर्शन संध्या आंबटकर यांनी केले. या वेळी हेमलता देशमुख, अनुजा घाटोळ, स्वरूपा वानखेडे, रेखा चटप, कविता वानखेडे, अर्चना नगराळे, नेहा शर्मा, रंजना शुक्ल, शिल्पा गुर्जर, स्वाती वैरागडे, मयुरी वैरागडे, श्वेता मेंढे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संकेत ज्वेलर्स आणि आई लॉनचे सहकार्य लाभले.
विशेष सहकार्य:
आकाश दादा वानखेडे, मंगेश आंबटकर, सुधाकर चटप, बबलू सरफराज, सुमित मेंढे, ऋषी जैस्वाल, रुपेश इचकते, सचिन चंदेल यांनी विशेष सहकार्य केले.
महिला दिनाचा उत्साह अनोख्या रंगात
या भव्य कार्यक्रमामुळे बुटीबोरीतील महिलांना एका मंचावर एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. महिलांच्या सहभागाने आणि विविध उपक्रमांमुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. महिला दिनाच्या आनंदी सोहळ्याने संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते.