दुचाकीचोरी प्रकरणातील आरोपींचा पर्दाफाश

भद्रावतीतून तीन दुचाकी जप्त

बुटीबोरी : काही दिवसांपूर्वी बुटीबोरीतील विविध परिसरातून दुचाकी चोरीच्या काही घटना घडल्या. यामध्ये चोरीला गेलेल्या तीन दुचाकी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथून बुटीबोरी पोलिसांनी मुख्य आरोपीच्या ताब्यातून जप्त केल्या.

गजानन श्यामराव भटकर (३३, रा. भद्रावती, जि. चंद्रपूर) असे अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.महिनाभरापूर्वी बुटीबोरी येथील मराठा ले-आउटमधून होंडा सीबी शाइन क्र. एमएच ३४ / बीई १८७७ तर बावलानगरातून होंडा सीबी शाइन क्र. एमएच ४० / बी ४६२३, गायत्री ले-आउटमधून होंडा ड्रीम क्र. एमएच ४० / एजी ६३६१ या दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार फिर्यादींनी नोंदविली होती.

घटनेचा तपास बुटीबोरीचे ठाणेदार भीमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात पोहवा. प्रशांत मांढरे यांच्याकडे सोपविला. पोलिसांना चोरीला गेलेल्या तिन्ही दुचाकीपैकी एक चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे असल्याची माहिती मिळाली. त्यांनी भद्रावती येथे जाऊन चोरलेल्या दुचाकीबाबत विचारपूस केली असता ती संशयित आरोपी गजानन भटकर याने ठेवल्याची माहिती मिळाली.

मात्र गजाजन चंद्रपूर येथील कारागृहात शिक्षा भोगत असल्याचे कळले. पोलिसांनी भद्रावती पोलीस ठाणे गाठून संशयित आरोपीबद्दल चौकशी केली. तो विविध गुन्ह्यांतील आरोपी असून सध्या तो कारागृहात असल्याचे समजले. बुटीबोरी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया करीत गजाजननला चौकशीकरिता कारागृहातून ताब्यात घेतले.

विचारपूस केली असता त्याने बुटीबोरी परिसरातून तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिन्ही दुचाकी भद्रावतीतून ताब्यात घेतल्या. दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. ही कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोहवा. मांढरे, तिलक रामटेके, प्रवीण देव्हारे आदींनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *