बुटीबोरी, ता.14 कर्मयोगी फाउंडेशनच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराला ग्रामीण भागातील वृद्धांनी प्रचंड प्रतिसाद दिला. कर्मयोगी फाउंडेशनने २०२४ मध्ये ग्रामीण भागात विशेषतः नागपूर व हिंगणा तालुक्यातील गावागावांत मोठ्या प्रमाणात निःशुल्क नेत्र तपासणी शिविर राबविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून ५ हजार वृद्धांना चष्मे वाटप करण्यात आले. आजपर्यंत कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या कृतिशील नियोजनातून अनेक निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले.
कर्मयोगी फाउंडेशन, महात्मे नेत्र रुग्णालय व ग्रामपंचायत कान्होलीबारा यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप शिबिर घेण्यात आले. ११४ व्यक्तीची तपासणी करून त्यात ३३ रुग्ण मोतीबिंदू असल्याचे आढळले. ५१ रुग्णांना निःशुल्क चष्मे वाटप करण्यात आले.
मोतीबिंदू असलेल्या रुग्णाची ११ जुलैला महात्मे नेत्र रुग्णालय येथे निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिराला डॉ. अरविंद डोंगरवार, डॉ. प्रियेश माहुले, गौरव चन्ने, सानिया बावनकुळे यांनी वैद्यकीय सेवा दिली. सरपंच पल्लवी कुकडकर, उमेश कुकडकर याप्रसंगी उपस्थित होते.