बुटीबोरी:- ग्रामीण किक बॉक्सिंग स्पर्धा मध्ये नामांकित बुटीबोरीतील सेंट क्लारेट शाळेतील विद्यार्थ्यांनी सुयश गाठले असून या विद्यार्थ्यांवर आज अनेक स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या चतुर्थ नागपुर जिल्हा कैडेट आणि जुनियर ओपन किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्थानीय शिंगारे हॉल टाकळघाट येथे संपन्न झाली.
या स्पर्धेत जिल्ह्यातील शंभराहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला असता या चॅम्पियनशिप मध्ये बुटीबोरीतील सेंट क्लारेट शाळेतील किक बॉक्सिंग करणाऱ्या विद्यार्थीने चमकदार कामगिरी करीत
बुटीबोरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या स्पर्धामधे देवांशु डबुरकर २ स्वर्ण १ रजत,रुद्र भोयर २ स्वर्ण १ रजत,अनुज कावळे १ स्वर्ण,१ रजत,तर सक्षम मांडरे,मोहील शेंडे,पृथ्वी अग्रवाल यांनी प्रत्येकी १ स्वर्ण प्राप्त करीत प्रथम स्थान तर संस्कृति बोपचे व पूर्वी मोहीरले दूसरा स्थान प्राप्त केले.
या विद्यार्थ्यांवर आज अनेक स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.या प्रतियोगितामध्ये जिल्ह्यातील विविध खेळाडूंचा समावेश होता.विद्यार्थ्यानी या चमकदार कामगिरीचे श्रेय आपल्या पालकासह मुख्य प्रशिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक,फादर मार्टिन डिसुजा,मैनेजर फादर वरगीस,फादर टोनी,फादर राजेश,मुख्य प्रशिक्षक सुमीत नागदवने सर,आणि शिक्षक वृंद यांना दिले.