parivartan mahila foundation

परिवर्तन बहुउद्देशीय महिला संस्था ने अपनी तरफ से कंबल,और चादरें का वितरण किया

बुटीबोरी : मागील अनेक वर्षांपासून सामाजिक काम करून कामाचा ठसा उमटवित सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देणाऱ्या स्थानिक परिवर्तन बहुद्देशीय महिला संस्थेने थोर संत गाडगे महाराज यांच्या क्रांतिकारी समाजसेवेला आदर्श मानून बुटीबोरी, टाकळघाट परिसरातील गोरगरिब, निराश्रीतांना चादर व ब्लँकेटचे वाटप केले.निराधार, गोरगरीब, दिव्यांग, रस्त्यावरील साधू, मनोरुग्ण आदी आपले दुःख कुणाला बोलून दाखवत नाही. त्यांचे दुःख भावना समजावून घेत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत कोणाकडे रुपयाची मागणी न करता पदाधिकाऱ्यांनी वर्गणी गोळा करून सामाजिक बांधिलकी जपली. ब्लँकेटचे वाटप केले. या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.थंडीत कुडकुडणाऱ्यांना ‘परिवर्तन’ची ऊब

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *