बुटीबोरी: अयांश टीव्हीएस येथे दिनांक ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी हेल्थ चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरादरम्यान Sure टेक हॉस्पिटल च्या वतीने महिलांचे हेल्थ कार्ड तयार करण्यात आले, जे त्यांना भविष्यातील आरोग्य सेवांसाठी उपयोगी ठरणार आहे.

या कार्यक्रमात महिलांसाठी विविध प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम आणि खेळांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे महिलांनी आनंदाने सहभाग घेतला. या उपक्रमातून महिलांच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासह, त्यांचा सन्मान आणि सामाजिक सशक्तीकरणाला चालना देण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता.

या विशेष कार्यक्रमामुळे अयांश टीव्हीएस येथे उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढेही असेच सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत, जेणेकरून महिलांचे आरोग्य आणि सशक्तीकरणाला प्रोत्साहन मिळेल.