हाइड्रा ने मारी मोटरसाइकिल को टक्कर, युवक की मौत

बुटीबोरी राँग साइडने येणाऱ्या हायड्राने चौकात अचानक वळण घेताच दुचाकीचालकाचा अंदाज चुकला आणि दुचाकी हायड्रावर आदळली.

यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी एमआयडीसी (ता. हिंगणा) परिसरातील केईसी चौकात बुधवारी (दि. ११) सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली.

सुशीलकुमार चंद्रभान गजभिये (४१, रा. अनुसया अपार्टमेंट, नागभूमी ले आऊट, छत्रपतीनगर, नागपूर) असे मृताचे नाव आहे. सुशीलकुमार हे बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील दिनशा कंपनीमध्ये एका डिपार्टमेंटचे प्रमुख म्हणून नोकरी करायचे. बुधवारी सायंकाळी सुटी झाल्यानंतर ते नेहमीप्रमाणे एमएच-३१/एफएच- ०७४९ क्रमांकाच्या मोटरसायकलने नागपूरला घरी परत जात होते.

दरम्यान, एमएच-३५/एजी-६०३३ क्रमांकाचा हायड्रा राँग साइडने येत होता. अचानक वळण घेतले आणि त्या हायड्राचा अंदाज आल्याने न मोटरसायकल हायड्रावर आदळली. यात सुशीलकुमार यांना गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच विनायक सातव, भारत तायडे, विनोद अहिरकर, राजू तायडे, दिलीप नवले, श्रीकांत गौरकार या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले.

तोवर हायड्रा चालक घटनास्थळाहून पळून गेला होता. त्यांनी सुशीलकुमार यांना जखमी अवस्थेत बुटीबोरी शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांनी कुणाल रविकांत मेश्राम (३६, रा. राजकमल चौक, विश्वकर्मानगर, नागपूर) यांच्या तक्रारीवरून हायड्रा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *