गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल

बुटीबोरीच्या स्वच्छतेसाठी घंटागाडी, ट्रॅक्टरची सोय

बुटीबोरी – स्थानिक नगरपरिषद येथे स्वच्छ भारत मिशन नागरी सुविधा योजनेंतर्गत ४४ लाख १० हजार रुपये किमतीच्या घंटागाडीचे लोकार्पण गुरुवारी (१३ जुलै) पार पडले. नगराध्यक्ष बबलू गौतम, उपाध्यक्ष अविनाश गुर्जर यांच्या हस्ते या गाड्यांची पूजाअर्चा करून लोकार्पण करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, स्वच्छता व आरोग्य सभापती मुन्ना जयस्वाल, शिक्षण सभापती विनोद लोहकरे, पाणीपुरवठा सभापती मंदार वानखेडे, बालकल्याण सभापती संध्या आंबटकर, नगरसेवक सनी चव्हाण, मनोज ठोके, संकेत दीक्षित, बबलू सरफराज, अभियंता नेहा पोतले आणि सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

नगरपरिषद सामान्य फंडातून स्वच्छतेवर खर्च केला जात होता. परंतु यामुळे नगरपरिषदेच्या तिजोरीवर अधिकचा भार पडायचा. स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत ४४ लाख १० हजार रुपयांच्या घंटागाड्या उपलब्ध करून देत स्वच्छतेवर होणारा खर्च कमी

करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्याचे मत आरोग्य व स्वच्छता सभापती मुन्ना जयस्वाल यांनी मांडले. यशस्वितेसाठी श्रद्धा येगडे, सुभाष श्रीपदवार, स्नेहा वरभे, मुख्तार सय्यद, आनंद नागपुरे,

मिलिंद पाटील, संजय संतोषवार, पूजा नक्षिणे, विशाल दुधे, प्रफुल्ल टेंभरे, प्रवीण कारेकर, पिंटू खडतकर, विकी ठाकरे, सम्यक दुधे यांनी सहकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *