नागपूर तालुक्यातील ग्रा.पं. बोथली अंतर्गत बोरखेडी फाटक व विविध ले आऊट येथे नुकतेच विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार व राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी ग्रा.पं. बोथली येथे जलजीवन मिशन, जनसुविधा, नागरी सुविधा, दलित वस्ती सुधार योजना, पंधरा वित्त आयोग, जिल्हा परिषद स्तर अंतर्गत करोडो रुपयाचे सिमेंट रोड बांधकाम, नाली बांधकाम, रस्ता खडीकरण, रुंदीकरण, रस्ता | पिण्याच्या पाण्याचा संप अशा विविध | विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर जि. प. अध्यक्ष मुक्ता कोकडे, माजी मंत्री रमेश्चंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत, जि.प. सदस्य वृंदा नागपुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अहमदबाबू शेख, उपसभापती प्रकाश नागपुरे नागपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती व विध्यमान सदस्य संजय चिकटे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष वसंत कांबळे, शिवसेना नागपूर तालुका अध्यक्ष तुषार डेरकर, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव राजू गावंडे, विष्णू माथणकर, दामू गुर्जर, प्रदीप चंदेल, बोथली ग्रा.पं. सदस्य ममता बारंगे, तुलसी आत्राम, जुगनाकेबाई, गणेश कडू, नंदू मरसकोल्हे, इंदू तोडसे, साधना उताणे, ग्रा.पं. सचिव रवींद्र हुसे आदी उपस्थित होते.

विशेष बाब म्हणजे बोथली-बोरखेडी जि.प. सर्कलच्या सदस्या वृंदा नागपुरे यांनी आपल्या अथक परिश्रमाणे नागरी सुविधा योजना मधून एक करोड रुपये खेचून आणत कामे केली. त्याचप्रमाणे दलित वस्ती सुधार योजना, नागरी, जनसुविधा व १५ वित्त आयोग मधून १ करोड ५९ लाख रुपये असे एकूण २ करोड ५९ लाख रुपयांचे कामे पूर्णत्वस आली तर काही प्रगतीपथावर असल्याने बोथली ग्रामवासीयांनी जि.प. सदस्य वृंदा नागपेर यांचे आभार व्यक्त केले.
