कर्मयीगने कृतीतून साजरी केली महापुरुषांची जयंती.

५१ व्यावसायिक छत्री वाटपाची यशस्वी संकल्पपूर्ती…
कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कार्य करणारे सामाजिक संघटन आहे, त्याची प्रचिती त्यांनी पुन्हा आपल्या कार्यात सातत्य राखत आपल्या कृतीतून दाखवून दिली.

कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे फुटपाथवर व्यवसाय थाटत ,उन्हातान्हात काम करत, हातावर आणून पानावर खाणाऱ्या गरजवंत मंडळीना कर्मयोगी फाऊंडेशनने माणसातली माणुसकी जपून २०२२ मध्ये १०१ छत्री वाटप केले होते. याच कार्यात सातत्य राखत २०२३ मध्ये सुद्धा कर्मयोगीने ५१ छत्री वाटपाचा संकल्प केला होता.

हा संकल्प महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी बुटीबोरी परिसरातील फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या ५१ लोकांना छत्री देऊन त्यांना प्रेमरूपी मायेची सावली कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे देण्यात आली..

या उपक्रमाविषयी सांगताना कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे सांगतात की आजही आपल्या देशात प्रचंड गरिबी आहे. आम्ही ग्रामीण भागातील परिस्थिती इतकी जवळून पाहली आहे की, घरातला एखादा माणूस मरण पावला तर अंत्यसंस्कार करण्यासाठी सुद्धा त्या परिवाराकडे पुरेसे पैसे नसतात, हे वास्तव सत्य आहे.. त्यातच ऑनलाईन मार्केटिंग मुळे आज सर्वकाही घरापर्यंत मिळू लागल आहे. त्यामुळे फुटपाथवर विक्री करणाऱ्या लोकांना त्याचे सुद्धा चटके बसू लागले आहे.

त्यामुळे बाहेर गावावरून येऊन दिवसभर उन्हातान्हात बसून सुद्धा हाती खूप काही लागत नाही. त्यातच आता उन्हाचे चटके, त्यामुळे कोठेतरी यांना प्रेमरूपी आधार मिळावा यासाठी गोरगरीब उन्हातान्हात काम करणाऱ्या मंडळींना प्रेमरूपी मायेची सावली देण्यात आली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशनची मंडळी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *