बुटीबोरी बोरखेडी (रेल्वे) येथे जय बजरंग क्रीडा मंडळद्वारा आयोजित ‘सरपंच चषक’ खुल्या कब्बडी स्पर्धेत बुटीबोरी येथील न्यू व्हिजन स्पोर्टिंग क्लबने अवघ्या दोन गुणांच्या फरकाने माँ अनुसया क्रीडा मंडळ, दुधा संघावर विजय संपादित करून सरपंच चषकावर आपले नाव कोरले . बोरखेडी (रेल्वे) येथे गत दहा वर्षांपासून ‘सरपंच चषक कब्बडी |
स्पर्धेचे भव्य आयोजन केले जात असून सरपंच राजू घाटे हे ग्रामीण भागातील खेळाडूंना अंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्तम असे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे. या स्पर्धेत एकूण ३५ संघांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी बुटीबोरी येवल न्यू व्हिजन स्पोर्टिंग क्लब व माँ अनुसया क्रीडा मंडळ, दुधा यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात १४-१२ अशा दोन गुणांच्या फरकाने न्यू व्हिजन स्पोर्टिंग क्लबने विजय मिळविला.
या स्पर्धेतील प्रथम पुरस्कार २२,२२२ रुपये जय बजरंग क्रीडा मंडळ कडून, द्वितीय पुरस्कार १७, ७७७ रुपये स्व. कालिदास गुप्ता स्मृतिप्रीत्यर्थ सौरव गुप्ता यांच्याकडून, तृतीय पुरस्कार ११,१११ रुपये जलसा ढाबा, पप्पू मोहारे यांच्याकडून तर चतुर्थ पुरस्कार ५,५५५ रुपये रामदास भोजने यांच्याकडून विजेत्या व उपविजेत्या संघाना भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गंगाधर लेंडे, बुटीबोरी नगरपरिषदेचे पाणी पुरवठा व मलनिस्सारण सभापती मंदार वानखेडे, माजी जि.प. सदस्य रुपराव शिंगणे, सरपंच राजू घाटे व भाजप महामंत्री अनिल ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी बोरखेडी (रेल्वे) ग्रा.पं.चे माजी सरपंच कृष्णा ढोके, माजी उपसरपंच अशोक मानकर, रामदास भोजने, पप्पू मोहारे, सौरव गुप्ता, रमेश झाकणेकर, शंकर पाचंगे, शंकर भोजने, विठ्ठल भोजने, भास्कर मेहरकुरे, सतीश धुर्वे, सागर घुगल, सुधाकर पानघाटे, अलकेश ढोके आदी उपस्थित होते.