साहित्य भूषण अण्णाभाऊ साठे स्मारक समिती एम अाय डी सी बुटीबोरी. इंन्डोरामा काॅलनी येथील साहित्य सम्राट लोक शाहिर अण्णाभाऊ साठे यांना ५३ व्या स्मृतिदिना निमित्त अभिवादन करण्यात अाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.श्री गजानन बावणे तर प्रमुख पाहुणे सतिश भाऊ होते.
प्रस्थाविक भाषणा मध्ये समितीचे सचिव श्री अंकुश बावणे यांनी साहित्यकलेचे जगविख्यात साहित्य सम्राट लोक शाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जिवणावर प्रकाश टाकीत म्हणाले की अण्णाभाऊ म्हणजे जातीच्या उतंडीमुळे शिक्षणा पासुन समग्र विकासापासुन वंचित रहालेल्या मांतग समाजातील एक समृध्द व्यक्तीमत्व होते.
त्यांनी दु:खाच्या विचार न करता अापले विचार कार्य समाजात पेरले.तर अापल्या अध्यक्षीय भाषणात श्री गजानन बावणे यांनी अण्णाभाऊच्या ३५ कादंबर्या,अाठ पटकथा,तिन नाटके,व एकप्रवासवर्णन,तेरा कथासंग्रह,१४लोक नाट्य,अाणी १० प्रसिध्द पोहाडे, इतके प्रगढ साहित्य अाहे हे सांगण्यात अाले.अाणी दोन वर्ष कोरोनामुळे अापुण जयंती, पुण्यतिथी करु शकलो नाही म्हणुन या सामोरील पुन्हा नेहमी प्रमाने त्याच जोमाने समाजातील कार्य अापल्या नेत्याची जयंती मोठ्या उत्सावात करु असे अापल्या भाषणात मत व्यक्त केले.अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी निमित्त मा.श्री गोपालराव वानखेडे यांच्या तर्फे भोजनदानाचा कार्यक्रम करण्यात अाला.
प्रस्ताविक व संचालन श्री अंकुश बावणे यांनी केले तर अाभार श्री गरिबा खोडके यांनी मानले. यशस्वितेसाठी श्री गजानन बावणे,गरिबा खोडके,अंकुश बावणे, बाबाराव डोंगरे, निवृती वानखेडे, गोपालराव वानखेडे, कमलेश डोंगरे.अाषिश वानखेडे, सौरल वानखेडे प्रथमेश खोडके, सौं.अर्चणाताई डोंगरे,अल्काताई वानखेडे,अाशाताई खोडके यांनी सहकार्य केले.