तरुणाची दगडाने ठेचून हत्या

टाकळघाट मार्गावरील इंडोरामा गेट क्र. ७ जवळील घटना

अज्ञात आरोपींनी एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली . ही घटना एमआयडीसी बुटीबोरी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या टाकळघाट मार्गावरील इंडोरामा गेट क्र. ७, उमरी शिवार येथे 30 june गुरुवारी पहाटे निदर्शनास आलली. आकाश रमेश फेंडर (२२), रा. घारफड, ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ, ह.मु. गणेशपूर, ता. हिंगणा असे मृतक तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक याच परिसरात मिस्त्रीचे काम करायचा. आज गुरुवारी पहाटे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना टाकळघाट मार्गावरील इंडोरामा गेट क्र. ७ जवळील नालीलगत चेहरा छिन्नविछिन्न झालेला एक मृतदेह आढळून आला. तेव्हा काही जागरुक नागरिकांनी त्वरित एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांना सूचना दिली.

माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कोळी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतकाचा चेहरा पूर्ण दगडाने ठेचलेल्या अवस्थेत होता. यामुळे ओळख पटणे अवघड होते. मृतकाच्या हातावर आकाश नावाचे गोंदण असल्याने व एक कागदावर मो. क्रमांक लिहिलेली चिट्टी मिळून आल्याने मृतदेह आकाश फेंडर याचा असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक कोळी, भास्कर मेटकर करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *