Digital marketing butibori

ईएसआयसी रुग्णालयाला मिळणार संजिवनी

  • केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची ग्वाही
  • लोकसभेत खासदार कृपाल तुमाने यांचा तारांकित प्रश्न

नागपूर, दि. २१ मार्च देशभरातील ईएसआयसीच्या ५७ रुग्णालयांचे काम वेगवेगळ्या कारणांनी थांबले आहे. बुटीबोरी एमआयडीसीत प्रस्तावित रुग्णालयाच्या मार्गातील अडळे दूर करण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी लोकसभेत दिली. रामटेकचे ज्येष्ठ शिवसेना खासदार श्री कृपाल तुमाने यांनी संसदेत तारांकित प्रश्नाद्वारे नागपूर जिल्ह्यातील सक्करदरा नागपूर व बुटीबोरी येथील ईएसआयसीच्या दोन्ही रुग्णालयांच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित केला.

ayansh tvs butibori


त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना यादव यांनी सांगितले की, देशभरात ईएसआयसीचे १६० रुग्णालये व १५१७ औषधालये आहेत.
नागपूर जिल्ह्यात सुमारे ४ लाख कामगार या लाभासाठी पात्र आहेत. बुटीबोरी या पंचतारांकित एमआयडीसीमधील कामगारांवर उपचारासाठी बुटीबोरी एमआयडीसी परिसरात ईएसआयसीचे रुग्णालय प्रस्तावित आहे. २०१९ मध्ये तत्कालीन केद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते या रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर जागा बदलण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष कामच सुरू होऊ शकले नाही.


शहरातील ईएसआयसीरुग्णलयात कोणतीही व्यवस्था नाही. साधे सोनोग्राफीचेही यंत्र नाही. यामुळे अल्प मिळकत असणाऱ्या कामगारांना खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. याप्रकाराकडे तुमाने यांनी लक्ष वेधले. त्यावर यादव यांनी देशभरातील रुग्णालयांबाबतची माहिती मांडली. खोळंबलेल्या रुग्णालयांचे काम मार्गीलावण्यासाठी डॅशबोर्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. या पोर्टलच्या माध्यमातून पुढील सर्व कामे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतंत्र बैठक घेऊन बुटीबोरी व नागपूर शहरातील रुग्णालयातील सर्व अडचणी मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *