butibori

कर्मयोगी फाऊंडेशनचे महाश्रमदान

कर्मयोगी फाऊंडेशनने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर सत्य, सातत्य व समर्पण या त्रिसूत्रीवर काम करत दिनांक २३ जानेवारी ते २५ जानेवारी या तीन दिवसांत बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील बालभारती मैदान जेथे अनेक तरुण, तरुणी नोकरी मिळवण्यासाठी शारीरिक सराव करतात, या ठिकाणी सकाळी ६:३० ते ९ या वेळेत श्रमदान करून मैदानाची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. यावेळी कर्मयोगीच्या जवळपास २५ सदस्यांनी झाडू, पावळे, कुऱ्हाडी, घमिले घेऊन जवळपास १० ते १५ एकराचे हे मैदान साफ स्वच्छतेने पिंजून काढले.

विशेषतः यात कर्मयोगी महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता. प्लास्टिकच्या पिशव्या सोबतच कागदाचा छोटान छोटा तुकडा व झाडांचा पाला पाचोळा पुर्णपणे वेचून व झाडू मारून हा परिसर अतिशय स्वच्छ करण्यात आला. या कामासाठी नगरपरिषद बुटीबोरीने आपल्या कचरा गाळ्या पाठवून कचरा संकलन करत कर्मयोगी फाऊंडेशनच्या या कार्याला सहकार्य केले.
कर्मयोगी फाऊंडेशनने प्रजासत्ताक दिनाच्या खऱ्या शुभेच्छा आपल्या कृतीतून दिल्याबद्दल सर्वच थरांतून कर्मयोगी फाऊंडेशनच्या या महाश्रमदानाचे कौतुक होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *