कर्मयोगी फाऊंडेशनने २०२२ मध्ये ५१ गावांमध्ये वृद्ध मंडळीना आधार काठी वाटपाचा निर्धार केला आहे. त्याच अनुषंगाने बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कोरोना नियम पाळत प्रत्यक्ष कृतीतून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती बोथली तहसील नागपूर येथील वृद्ध मंडळीना आधार काठी देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बोथली ग्रामच्या सरपंच कविता नामुर्ते, उदघाटक उपसरपंच अरुण वानखेडे, प्रमुख उपस्थिती नागपूर पंचायत समिती सदस्य नितीन देवतळे, सचिव रवींद्र हुसे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
उदघाटनिय भाषणात अरुण वानखेडे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर प्रकाश टाकत ते म्हणाले कर्मयोगी फाऊंडेशन जे काम करत आहे त्या कामाची कल्पनाही आम्ही करू शकत नाही इतके मोठे कार्य त्यांनी उभारले आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य नितीन देवतळे म्हणाले की खरोखर कर्मयोगी फाऊंडेशन सारख्या सामाजिक संस्थाची आज समाजाला गरज आहे.
समाजाला अपेक्षित वृद्ध व गोरगरीब लोकांसाठी कर्मयोगी फाऊंडेशन काम करत आहे..
यावेळी, प्रकाश झुरमुरे, रमेश गायकवाड, गणेश भरडे, गणेश कडू, स्वाती पाटील, ज्ञानेश्वरी बिजेवार, ममता वारंगे, तुलसी आत्राम ही मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती..
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी यशस्वी मेहनत घेतली.
.