नागपूर ■ स्व. किशोरभाऊ वानखेडे बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने रविवार दि. ८ ऑक्टोबरला येथील आई सभागृहामध्ये आयोजित आयुष्यमान कार्ड शिबिराचा एकूण ७६१ नागरिकांनी लाभ घेतला. या कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळू शकणार आहे. स्व. किशोरभाऊ वानखेडे यांनी केलेले समाजकार्य सर्वश्रुत आहे. त्यांच्याद्वारे चालत आलेल्या समाज कार्याचा वारसा त्यांचे लहान बंधू आकाश दादा वानखेडे व स्व. किशोरभाऊ यांचे सुपूत्र मंदार वानखेडे मागील अनेक वर्षांपासून समोर नेत आहे. दरम्यान या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष आकाश वानखेडे नगराध्यक्ष बबलू गौतम, मुन्ना जैस्वाल महिला व बालकल्याण सभापती संध्या आंबटकर, नगरसेवक बबलू सरफराज सन्नी चौहान, मंदार बानखेडे, विना ठाकरे, रेखा चटप, अर्चना नगराळे मंगेश अंबटकर, महेंद्रसिंग चौहान दीपक गुर्जर, जेऊरकर, रामदास राऊत नीलेश वानखेडे, लीलाधर सहारे सुनील किटे आदी उपस्थित होते शिबिरात आरोग्य सेवक म्हणून उपस्थित झालेल्या कल्पना चंदेल, मानसी विश्वकर्मा, योगिनी पटले, मनीषा सोनवणे यांच्या सहकार्याने सायं ५ वाजेपर्यंत परिसरातील जवळपास ७६१ नागरिकांचे आयुष्यमान कार्ड बनविण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सचिन चंदेल, ऋषी जैस्वाल, ओम अंबटकर लोकेश मामुलकर, विनोद मोहोड, हरीश शिरसागार, वैभव काकडे, वैभव पारधी लक्ष जैस्वाल, शोन कीटे, पार्थ वानखेडे मयंक विश्वकर्मा, अमित विश्वास, धीरज बिसेन, कुणाल ठावरी, ब्रिजेश यादव मोनेश खिडकिकर, आयुष देरकर कुणाल कुहिटे, शुभम राऊत, प्रणय गौतम आदींनी परिश्रम घेतले.