बुटीबोरीत ४९ लाखांचा ४९५ किलो गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई | विशाखापट्टणमवरून बिहारला जात होती खेप

बुटीबोरी : नागपूर ग्रामीण उपविभागातील बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंगवर असताना चंद्रपूर-नागपूर महामार्गावरून कंटेनरमधून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. नाकाबंदीदरम्यान कंटेनर थांबविला असता त्यामध्ये ४९५ किलो ६०० ग्रॅम गांजा आढळला. या गांजाची किंमत ४९ लाख ५६ हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई गुरुवारी (११ जानेवारी) करण्यात आली. माहितीनुसार, कंटेनर क्रमांक एचआर ५५/एस २३४६ ने अमलीपदार्था (गांजा) ची वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. दरम्यान, पथकाने तातडीने नाकाबंदी करून कारवाई केली. आरोपी शब्बीर जुम्मे खान (३०, रा. मनपूर करमाला, जोगवा, ता. रामगडजी अलवर, राजस्थान), मुनवर आझाद खान (२८, रा. शहापूर नागली, ता. नुहजी मेवात (हरयाणा), गाडीमालक हाफिज जुमे खान, रा. यमुनानगर (हरयाणा) यासह इतर एका आरोपीला अटक करण्यात आली. आरोपींनी कंटनेरमध्ये ड्रायव्हरच्या सीटच्या मागील भागात कप्पा तयार करून त्यात पांढऱ्या रंगाच्या बोरीमध्ये गांजा लपवून ठेवला होता. यामधील गांजा ४९५ किलो ६०० ग्रॅम किंमत ४९ लाख ५६ हजार रुपये, कंटेनर वाहन किंमत २० लाख रुपये, दोन मोबाइल संच किंमत २० हजार रुपये, असा एकूण ६९ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा गांजा सुनील नावाच्या व्यक्तीचा होता. हे दोन्ही आरोपी पसार आहे. या

गांजाची वाहतूक विशाखापट्टणम येथून बिहार येथे होत असल्याची कबुली आरोपींनी दिली.
आरोपीविरुद्ध बुटीबोरी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम २०,२२ एनडीपीएस अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. जप्त मुद्देमालासह आरोपींना बुटीबोरी पोलिसांच्या

ताब्यात देण्यात आले. १५ जानेवारीपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, बट्टलाल पांडे, पोलीस हवालदार अरविंद भगत, गजेंद्र चौधरी, मिलिंद नांदूरकर, संजय बांते, मयूर ढेकळे, सत्यशील कोठारे, पोलीस नायक अमृत किनगे, रोहन डाखोरे, पोलीस अंमलदार राकेश तालेवार, चालक पोलीस अंमलदार आशुतोष लांजेवार, सुमित बांगडे, सायबर सेलचे सतीश राठोड, मृणाल राऊत यांच्या पथकाने पार पाडली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *