धर्मवीर संभाजी बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम
बुटीबोरी जवळील धर्मवीर संभाजी बहुउद्देशीय संस्था सातगावर्फे येत्या १६ जानेवारीला त्रिमूर्ती हनुमान मंदीर परिसरात संभाजी चषक कबड्डी स्पर्धेच्या खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.दोन दिवसीय या कबड्डी स्पर्धेत प्रथम पारितोषिक अॅड. राजकुमारी रॉय यांचेकडून ४१ हजार रोख व चषक, द्वितीय पुरस्कार माणिकराव मुरस्कर यांच्याकडून ३१ हजार रोख वचषक, तृतीय पुरस्कार
स्व. सखुबाई डोईफोडे स्मृतीप्रित्यर्थ सुरेश डोईफोडे यांच्याकडून २१ हजार रोख व चषक तर चतुर्थ पुरस्कार प्रकाश घायवट यांच्याकडून ११ हजार रोख व चषक देण्यात येईल तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट रेडर, डिफेडर, अष्टपैलू खेळाडू यांना फ्रीज, एलइडी टीव्ही, मोबाईल, सायकल, सिलिंग फॅन यासारखे अनेक पुरस्कार वितरित केल्या जाईल. या सामन्यांचे उद्घाटन माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री रमेशचंद्र बंग तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड, माजी आमदार विजय घोडमारे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अहमदबाबू शेख, उपसभापती प्रकाश नागपुरे, जि.प. सदस्य दिनेश बंग आदी उपस्थित राहतील.
कबड्डी सामन्यांच्या समापन सोहळ्याप्रसंगी १८ जानेवारीला बक्षीस वितरणाकरिता करीता माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे, वामन सातपुते, पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील, अशोक कोळी, सुधाकर धामन्दे, योगेंद्र धांदे आदी मान्यवर उपस्थित राहतील. कबड्डी स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता धर्मवीर संभाजी बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष योगेश सातपुते आणि समस्त कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.