KARMYOGI FOUNDATION

कर्मयोगीची ५१ शिलाई मशीन वाटपाची यशस्वी संकल्पपूर्ती

कोरोना संकटकाळात जीवनसाथी हरवलेल्या ५१ विधवा ताईंना कर्मयोगीचा शिलाई मशीनचा आधार


◆ पाच टप्यात ५१ शिलाई मशीनचे यशस्वी वाटप.कर्मयोगी फाऊंडेशन


हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर काम करत आहे, या तत्त्वाप्रमाणे त्यांनी गोरगरीब विधवा महिलांसाठी,

विशेषतः कोरोना संकट काळात ज्यांचा आधार हरवला आहे त्या ५१ ताईंना शिलाई मशीन देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचा जो

संकल्प करण्यात आला होता त्याची सुरवात गाडगेबाबा याच्या जयंतीदिनी २३ फेब्रुवारी २०२१ रोजी सुरवात करून पुढे पाच टप्यात ८०.

गावात सर्वेक्षण करून ४१ गावातील गरजवंत शिवणकला हस्तगत असणाऱ्या महिलांना या संकल्पाचे व्यवस्थित नियोजन करून पहिल्या टप्यात १३

दुसऱ्या टप्यात ११ तिसऱ्या टप्यात १२, चौथ्या टप्प्यात ९ व दिनांक २० डिसेंबर २०२१ ला गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनाचे

औचित्य साधून केईसी ट्रेनिंग सेंटर बुटीबोरी येथे समारोपीय कार्यक्रमात ६

ताईंना शिलाई मशीन देऊन ५१ शिलाई मशीन वाटपाचा यशस्वी समारोप करण्यात आला..


या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद नागपूर उज्वला बोढारे, उदघाटक जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नागपूर ग्रामिण आकाश वानखेडे

प्रमुख उपस्थिती पोलीस उपविभागीय अधिकारी बुटीबोरी मा. सौ. पूजा गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य नागपूर मा. सौ. वृंदा नागपुरे,

सिनियर प्रोडक्शन मॅनेजर केईसी लिमिटेड बुटीबोरीचे नीरज सेलोट, कामगार कल्याण मंडळ बुटीबोरीचे सुधर्मा खोडे

सामाजिक कार्यकर्ते अनिल क्षीरसागर ही मंडळी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होती.
यावेळी अध्यक्षीय भाषणात उज्वला बोढारे म्हणाल्या की जन्म सर्वानाच मिळतो प्रत्येक जण स्वतःसाठी जगतो

थोडी लोक असतात जी दुसऱ्यासाठी जगतात, त्यात प्रामुख्याने कोणाच नाव घेता येत असेल तर ते कर्मयोगी फाऊंडेशनचंच घ्यावं लागेल.
ज्या प्रकारे कपडे धुताना सोबतच आपले हात सुद्धा स्वच्छ होत असतात त्याचप्रकारे कर्मयोगी फाऊंडेशन सोबत काम करताना प्रत्येकाचं जीवन सार्थक होते

कर्मयोगी फाऊंडेशनने फक्त देण्याचंच काम न करता लोकांचे मन सुद्धा चांगल्या कामासाठी परिवर्तित केले आहे. यावेळी अध्यक्षीय भाषणात आकाश वानखेडे म्हणाले की एखाद्या व्यक्तीने ठरविले तर ते किती मोठ काम करू शकतात यांचीच प्रचिती म्हणजे कर्मयोगी फाऊंडेशन होय. कंपनीत काम करणारे सामान्य कमगार एकत्र येतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात फक्तंनी फक्त देण्याचं काम करतात तेच देण्याच काम जर कर्मयोगी फाऊंडेशनच

या भागातील श्रीमंत लोकांनी घेतलं तर या भागातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलविता यईल असे ते यावेळी आवर्जून म्हणाले.

या कार्यक्रमाला पहिल्या टप्यापासूनच्या जवळपास सर्वच महिलांनी उपस्थिती दर्शवून या समारोपीय कार्यक्रमाची शोभा वाढवली

व खरोखरच संकटकाळात कर्मयोगी फाऊंडेशनने आमच्या जीवनाला आधार दिला हे अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करत बोलून दाखवील.
हा संकल्प यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळीनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *