कर्मयीगीची हातावर आणून पानावर खाणाऱ्या लोकांना मायेची सावली व्यवसायिक छत्री वाटपाचा संकल्प
५१ व्यावसायिक छत्रीचे वाटप संकल्प
कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कृतीवर कार्य
करणारे सामाजिक संघटन आहे, त्याची प्रचिती त्यांनी पुन्हा आपल्या कृतीतून दाखवून दिली.
फुटपाथवर व्यवसाय थाटत ,उन्हातान्हात काम करत, हातावर आणून पानावर खाणाऱ्या गरजवंत मंडळीना कर्मयोगी फाऊंडेशनने माणसातली माणुसकी जपून १०१ व्यवसायिक छत्री वाटपाचा संकल्प केला आहे.
हा संकल्प दोन टप्यात पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले आहे.
त्यातील पहिल्या टप्यातील ५१ छत्रीचे वाटप दिनांक १४ व १५ डिसेंबर २०२१ ला नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी, टाकळघाट, हिंगणा, रायपूर,
वनाडोंगरी, निलडोह, गुंमगाव, चिंचभवन येथील फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या लोकांना देऊन त्यांना प्रेमरूपी मायेची सावली कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे देण्यात आली.
या उपक्रमाविषयी सांगताना कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे सांगतात की शाळेत आम्ही प्रार्थना घेत होतो की भारत माझा देश
आहे सारे भारतीय माझे बांधव आहे, त्याप्रमाणे प्रत्येक गरीब, श्रीमंत भारतीय आमचा भाऊ आहे, सखा आहे.
आम्हाला ईश्वराने चांगले निरोगी शरीर दिले, चांगल्या घरी जन्माला घातले त्या ईश्वराप्रती कृतज्ञ राहून जे
लोक अनेक हालअपेष्टा सहन करत जीवन जगत आहेत .
त्यांना भरभरून प्रेम देणे हा आमच्या जीवनाचा उद्देश आहे कारण गाडगेबाबांना या गोरगरिब दुखीकष्टी लोकांमध्ये देव दिसला त्यामुळे या
देवरूपी गोरगरीब उन्हातान्हात काम करणाऱ्या मंडळींना प्रेमरूपी मायेची सावली देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशनची मंडळी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेत आहेत.
कर्मयोगी फाउंडेशन हे एक अवल फाउंडेशन आपल्या बुटीबोरीत व बुटीबोरी परिसर मधे अवल सामाजिक काम करत आहे.
हा फाउंडेशन ने छतरी वाटप व सिलाई मशीन व कोरोना कड़ात अनेक लोकना अना वाटप केले आहे,
हे फाउंडेशन आपले रोज़ एक सामाजिक काम कराला विसरत नही. पंकज ठाकरे आनि तेंचि टीम नव प्रमाण उत्सुक रहते सामाजिक काम कराला.
कर्मयोगी फाउंडेशन व त्याचा टीम ला सलाम आहे , तर हे फाउंडेशन मागील तीन वर्ष पासून काम करत आहे.
कर्मयोगी फाउंडेशन असेच काम करत राहवे ही आमची अपेक्षा आहे व्यवसायिक छत्री वाटपाचा संकल्प