
सुदृढ आरोग्य व उत्तम शरीरयष्टीसाठी योग हाच रामबाण इलाज : योग शिक्षिका प्रियांका घोडे..
*सेंट क्लारेट शाळेत साजरा करण्यात आला योग दिवस.
बुटीबोरी:- बुटीबोरी मधील सेंट क्लारेट शाळेमध्ये अंतर राष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.शाळेत योग कलेचा प्रसार व प्रचार व्हावा या माध्यमातून राष्ट्रीय पटु योग शिक्षिका प्रियांका घोडे यांच्या मार्गदर्शनात समस्त शिक्षकांनी योग कलेचे धडे आत्मसात केले.
शाळेचे मुख्याध्यापक फादर मार्टिन,अडमिनिस्ट्रेशन विभाग प्रमुख फादर टोनी,योग मार्गदर्शक मंजू मलिक,व शाळेतील उपस्थित संमस्त शिक्षक वृंद यांच्या उपस्थतीमध्ये सकाळी ८ वाजता शाळेच्या आवारात योगासनाच्या कृतीतून योग दिवसाचे महत्व पटवून दिले.

प्रत्येकानं मध्ये आरोग्यविषयक चांगल्या सवयी जडाव्या व सुदृढ आरोग्य व उत्तम शरीरयष्टी साठी योग हाच रामबाण इलाज आहे असे मत योग शिक्षिका प्रियांका घोडे यांनी व्यक्त केले.

सध्याच्या धावत्या व गतिमान युगात आपली शरीरयष्टी जपणे हे अत्यंत आव्हानात्मक बाब बनलेली आहे प्रत्येक मुलाचा चांगल्याप्रकारे शारीरिक विकास व्हावा याच उद्देशातून सेंट क्लारेट शाळेमधील असंख्य संख्येत उपस्थित असलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यास योग शिक्षिका प्रियांका घोडे यांनी योगासनाचे नियम,योगासनाच्या अनेक कृती ज्यामध्ये सूर्यनमस्कार भुजंगासन ,प्राणायम, शिरसासन,हलासना या प्रकारच्या विविध आसनाची कृती करुन दाखविली.व नियमित दररोज सकाळी हे आसने न विसरता आम्ही करू अशी शाश्वती दिली.

शाळेचे प्राचार्य फादर मार्टिन सर तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंदानी सुद्धा या आरोग्यमय जीवनाच्या वाटचालीकडे या योग दिनामध्ये सहभागी होऊन योग या आसनाची अनुभूती घेतली.