बुटीबोरी, वार्ताहर. येथील सिडको कॉलनीमध्ये दोन वर्षापासून पाणी पुरवठा होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. मेघदूत प्रकल्पातील सेक्टर ए व बीमध्ये पाणी पुरवठा अत्याधीक कमी दाबाने होत आहे.
काही भागात पुरवठा अजिबात होतच नसून त्याचा त्रास हा तेथील सामान्य नागरिकांना होत आहे. या ठिकाणी नगरपालिकेची वितरण व्यवस्था नसून एमआयडीसीव्दारे पाणी पुरवठा होतो.
असे असताना देखील नगर पालिका येथील नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवित आहे. येथील नागरिकांच्या समस्या त्वरीत सोडवाव्या अशी मागणी मेघदुत प्रकल्पाचे अभियंता यांना नगर परिषदेचे पाणी पुरवठा व मलनिस्सारण सभापती मंदार वानखेडे यांनी केली आहे.