बुटीबोरी-जलशक्ती मंत्रालय दिल्ली, राज्य पाणी व स्वच्छता मिशन महाराष्ट्र शासन, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद नागपूर व केआरसी सद्भावना ग्रामीण विकास संस्था, वर्धा अंतर्गत जल जीवन मिशन हा उपक्रम नागपूर जिल्ह्यातील सद्भावना
ग्रामीण विकास संस्थेच्या मार्गदर्शनातून राबवल्या जात आहे. या अंतर्गत आज दि. २० मार्च रोजी टाकळघाट येथिल सभागृहामध्ये ग्रामपंचायत स्तराकरिता दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून टाकळघाट ग्रामपंचायत सरपंच शारदाताई शिंगारे, उपसरपंच नरेशनरड, अर्चना धुर्वे, मिलिंद भगत, पुंडलिक वैद्य, अजय सोरदे आदी उपस्थित होते., मुख्य प्रशिक्षक, उपस्थिती होते.
या प्रशिक्षणामध्ये जल जीवन मिशन प्रकल्पाचा उद्देश, ग्रामपंचायतचे कार्य आणि जबाबदारी, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती यांची भूमिका, पाणी व्यवस्थापन, पूर्वनियोजन, गाव पातळीवर प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी, गावात पायाभूत सुविधांची निर्मिती आणि देखरेख प्रकल्पाचे नियंत्रण व हस्तांतरण, प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ आणि सुरक्षित शाश्वत ५५ लिटर पाणी देण्याच्या अनुषंगाने शासन प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची मुख्य भूमिका आणि नियंत्रण करणाऱ्या संस्थेची क्षमता बांधणी इत्यादी विषय प्रशिक्षणामध्ये सत्र पद्धतीने घेण्यात आले.
प्रास्ताविक सद्भावना संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भगत, संचालन अजय सोरदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रलय ताजने, स्वप्नील नरताम, वैभव नारताम, राकेश लांजेवार, अनिकेत मेश्राम आदींनी मोलाचे सहकार्य केले.