
बालाजी कॉन्व्हेन्ट, बुटीबोरी
बालाजी कॉन्व्हेन्ट शाळेमध्ये ‘सकाळ’ माध्यमसमूकाकडून घेण्यात आलेल्या सूर्यनमस्कार करण्यास शाळेतील शेकडोच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले.

शिक्षक नितीन कुरई, डॉ. मनमोहन रामटेके, घानिरम घरत यांच्या मार्गदर्शनात उपस्थित विद्यार्थ्यानी व शिक्षकांनी योग कलेचे धडे आत्मसात केले.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री टाले, प्राचार्य प्रवीण भोयर, गणेश बुटके, निखिल साबळेंसह श्रीमती मेश्राम,सचिन कुत्तरमारे, नितीन वाटमोडे, रोहन तावरे, वैभव खोब्रागडे, हर्षा कातकडे, आकाश सखले यांच्या उपस्थतीमध्ये प्रांगणात योगासनाच्या कृतीतून सामूहिक सूर्यनमस्कार व

ओंकार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सूर्यनमस्कार, भूजंगासन, प्राणायम, शिरसासन, हलासन या प्रकारच्या विविध आसनांचे प्रात्यक्षिक करुन दाखविले.

प्रत्येक मुलाचा चांगल्याप्रकारे शारीरिक विकास व्हावा याच उद्देशातून ‘सकाळ’ वृत्तपत्राने अतिशय छान उपक्रमाची सुरुवात केली, असे मत संचालक डॉ. प्रकाश नेऊलकर यांनी व्यक्त केले.
