Butibori – येथून नजीकच असलेल्या टाकळघाट खापरी (मोरे) या तीन किलोमीटरच्या मार्गावर मोठया प्रमाणात साम्राज्य असल्याने जीव मुठीत घेवून नागरिकांना मार्ग शोधावा लागतो. रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला जातो. त्यामुळे वाहनचालकांना होणान्या त्रासाकडे कोणाचेही लक्ष नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने टाकळघाट ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे सगळीकडे हाहाकार सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर जमा झालेल्या पाण्याला निपण्याची व्यवस्था नसल्याने पाणी त्याच ठिकाणी रस्त्यावरील सखोल भागात जमा राहते. आता पावसामुळे त्या ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्याचे दिवस असतांना शाळकरी विद्यार्थ्यांना वेळेत पोहचणे गरजेचे असते.
परंतु रस्त्यावरील खड्यांचे साम्राज्य बघता त्यांना खापरी मोरे- टाकळघाट हा तीन किलोमीटरचा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हदीत येतो. या मार्गाचे काम करण्याची मंजुरी, निविदा झाली आहे. या कामाकरिता तीन करोड ३३ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून येत्या एक दोन महिन्यांत काम सुरू होणार असल्याची माहिती खापरी मोरे ग्रामपंचायत प्रशासनाकडून मिळाली.
वेळेत पोहचणे शक्य होत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा आशयाचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष शाखा टाकळघाटच्या वतीने सरपंच शारदा शिंगारे यांना देण्यात आले. यासंदर्भात संबंधित विभागाला पाठपुरावा करून लवकरच खड्याची समस्या सोडविण्याचे आश्वासन सरपंच शारदा ज्ञानेश्वर शिंगारे यांनी दिले. निवेदन देतेवेळी किशोर बुरकर, मिलिंद खडतकर, रोशन अवचट, विजय पसारे, आशीष उईके, राहुल मोटे आदी उपस्थित होते.