शिवाजी महाराज चौकात खड्डेच खड्डे

दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीला निवेदन; अन्यथा आंदोलन

टाकळघाट, येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर मागील परिसरात नव्यानेच नामकरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मधोमध खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यातून ये-जा करताना होणारा त्रास लक्षात घेता युवा सेवा पदाधिकाऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत येथे निवेदन देण्यात आले.

टाकळघाट जवळच औद्योगिक वसाहत असल्याने या ठिकाणी कामगारांची मोठी संख्या आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांची वर्दळ असते शासकीय, शालेय कामासाठी या मार्गावरून जाताना नागरिकांना, शाळकरी विद्यार्थी, नागरिकांना खड्यांचा सामना करावा लागत असल्याने त्या खड्यांची दुरुस्ती करावी, अशा आशयाचे निवेदन येथील सरपंच शारदा शिंगारे यांना देण्यात आले. यावर सरपंच शारदा शिंगारे यांना विचारणा केली असता संबंधित रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असल्याने ग्रामपंचायतीतर्फे या संदर्भात पत्रव्यवहार करून पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले. यावेळी शहर प्रमुख टाकळघाट युवासेना वैभव घनवटे, शहर प्रमुख एमआयडीसी प्रज्वल झेले, अनिकेत भोयर, परिवर्तन सूर्यवंशी, मुकेश अवचट, तुषार कटरे, योगेश बिसेन, रतन वाकडे, आदित्य गायकी, रवी पांगुळ, शुभम झापे, अक्षय कापसे, गणेश चिंचुलकर, बादल गुलाबे उपस्थित होते.

पावसाने खड्डे भरले खचाखच

■ यावर्षी झालेल्या पहिल्याच वादळी पावसाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात पडलेल्या खड्डयामध्ये पाणी साचल्याचे स्थिती शनिवारी बघायला मिळाली. शनिवारी आठवडी बाजार भरत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील लोकांची भाजीपाला घेण्यासाठी गर्दी असते. परंतु या रस्त्यावरील खड्डयामध्येच पाणी साचून असल्याने भाजीपाला घेण्यास कसरत करावी लागल्याचे काही नागरिकांनी सांगितले. तसेच याचा त्रास दुकानदारांना, वाहनचालकांना झाल्याचे दिसले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *