बालाजी कॉन्व्हेंटची गुणवत्तेची परंपरा कायम

बुटीबोरी. बालाजी कॉन्व्हेन्टमधील विद्यार्थ्यानी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा 100% निकालाची परंपरा कायम ठेवली. शाळा संचालक डॉ. प्रकाश नेऊलकर यांनी साक्षी गिरडे, अनुश्री वाढी, . गौरव कडणोर, समर्थ माने सेमी इंग्लिश मिडीयम मधील श्रुती देखाटे, रुचिता सावरकर, वेदांत राऊत, सनोवर शेख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. बालाजी कॉन्व्हेन्ट इंग्लिश मिडीयम मधील साक्षी गिरडे 92.40% ( प्रथम ), अनुश्री वाढी 92.40% (प्रथम), गौरव कडणोर 91.20% (द्वितीय), समर्थ माने 90.80% (तृतीय)

तर सेमी इंग्लिश मिडीयम मधील श्रुती देखाटे 93% ( प्रथम ), रुचिता सावरकर 90.20% (द्वितीय), वेदांत राऊत 89.40% (तृतीय) पटकाविला . बालाजी शाळेचे संचालक डॉ.प्रकाश नेऊलकर शाळेचे मुख्याध्यापक गणेश बुटके,प्रवीण भोयर,संजय सुरसे,स्वप्नील तिजारे,धनिराम घरत,चक्रधर डेहणकर,ज्योती विश्वकर्मा,वैशाली ढवरे,मॅडम यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्याना पुढील वाटचाली करिता अनेक शुभेच्छा दिल्या.व सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे खूप खूप अभिनंदन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *