शिक्षकांनी विद्यार्थ्यांस पाजले चांगल्या सवयीचे बाळकडू.
बुटीबोरी:- शिक्षकांनी पत्करलेल्या जबाबदारीचे कर्तव्य म्हणजे आदर्श विद्यार्थी घडवणे होय त्याची जाण ठेवता आज बालाजी कॉन्व्हेंट मधील मराठी माध्यम सेमी वर्ग १ ते ५ सेमीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी चांगल्या सवयीचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमातून विद्यार्थी शिक्षक यांच्यात आंतरक्रिया घडून कार्यक्रमास चांगला प्रतिसाद प्राप्त झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव खोब्रागडे सरांनी केले. विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी चांगल्या सवयी कशा प्रकारे लावता येईल व वैयक्तिक स्वच्छतेकडे विध्यार्यानी कशाप्रकारे लक्ष द्यावे याचे मार्गदर्शन करण्यात आले.
मराठी माध्यम मधील हर्षा कातकडे मॅडम व नितीन वाटमोडे सर यांनी यांनी विद्यार्थ्यांना खेळण्या सोबतच नियमित अभ्यासाबाबत चांगल्या सवयी पाळाव्यात अशा अनेक सूचना दिल्या.तर रोहन तावरे सर यांनी सुद्धा लहान लहान मुलांना आरोग्यविषयक आवश्यक गोष्टींची माहिती दिली.
कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभल्यामुळे व आम्ही सर्व आज पासून या चांगल्या सवयी आपल्या अंगी रुजवून एक आदर्श विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न नक्कीच करू असे आश्वासन सर्व विद्यार्थ्यांनी या प्रसंगी दिले.या कार्यक्रमास शाळेचे मराठी माध्यमचे मुख्याध्यापक निखिल साबळे सर,रोहन तावरे,नितीन वाटमोडे,व हर्षा कातकडे,व नितीन कुरई सर उपस्थित होते.
कोट :नितीन कुरई (स.शिक्षक बालाजी कॉन्व्हेन्ट प्रा.शाळा)
आजचा विद्यार्थी उद्याचं सुंदर भविष्य म्हणून त्यांच्यावर लहान वयातच योग्य संस्कार रुजवणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यानी शाळेत घडलेल्या सर्व घटना दररोज आपल्या आई-वडिलांन जवळ प्रामाणिकपणे सांगाव्यात.शिक्षकानं सोबतच पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यास वेळोवेळी आवश्यक सूचना देणे गरजेचे आहे.पालक आणि शिक्षक यांच्यातील दरी भरल्यास विद्यार्थी आपले उज्वल भविष्य साकार करू शकतो.आदर्श नागरिक घडविण्याकरिता लहान वयातच मुलांना चांगल्या सवयीचे बाळकडू पाजने आवश्यक आहे.