सहा जणांना अटक, एक फरार : ३.८९ लाखांचे भंगार साहित्य जप्त
बुटीबोरी : एमआयडीसीतील सनविजय इन्फ्रा कंपनीत सुरक्षारक्षकपदी कार्यरत असलेल्या सात जणांनी कंपनीच्या आवारातील भंगार साहित्य चोरून नेल्याचे पोलिस तपासात उघड झाले. बुटीबोरी पोलिसांनी यातील सहा जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून ३ लाख ८९ हजार ८१० रुपये किमतीचे १,३२७ किलो भंगार साहित्य जप्त केले. फरार असलेल्या चोरट्याचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणेदार हृदयनारायण यादव यांनी दिली.
नितेश शरद देवतळे (२८, रा. कांढळी, जिल्हा वर्धा), आकाश नामदेव राऊत (३३, रा. पार्वतीनगर, नागपूर), कार्तिक राजकुमार भुते (३०, रा. सिरसोली, जिल्हा नागपूर), संदीप मलगाम (३६, रा. वासाळ-मेंढा, जिल्हा चंद्रपूर), रवींद्र मोटघरे (३९, रा. तळोधी- बाळापूर, जिल्हा चंद्रपूर) व विशाल पाटील (२४, रा. भारकस, ता. हिंगणा, जिल्हा नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी चोरट्यांची तर साहिल खडसे (रा. चंद्रपूर) असे फरार आरोपीचे नाव आहे. टॉवर प्रोजेक्ट्सचे उत्पादन करणाऱ्या सनविजय इन्फ्रामध्ये साहिल सुपरवायझर व इतर सर्व जण सुरक्षारक्षकपदी कार्यरत होते मागील आठवड्यात या कंपनीच्या आवारातून काही मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य चोरीला गेले होते. कंपनीचे व्यवस्थापन अधिकारी विनोदकुमार पी. के. यांच्या तक्रारीवरून बुटीबोरी (ता. नागपूर ग्रामीण) पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सुगावा मिळताच पोलिसांनी नितेश व इतरांना ताब्यात घेत विचारपूस केली गुन्ह्याची कबुली देताच त्याला अट केली आणि त्यांच्याकडून ३ लार ८९ हजार ८१० रुपये किमतीचे १,३२ किलो भंगार साहित्य जप्त केल ही कारवाई सहायक पोलिस निरीक्ष प्रशांत लभाने, हवालदार कुणा पारधी, आशिष टेकाम, युनूस खान दशरथ घुगरे, माधव गुट्टे यांच्या पथका केली.
गुन्हा दाखल होताच फरार
- पोलिसांनी या तपासात आधी कंपनीच्या प्रवेशद्वारासह आवारातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली. त्यात प्रबळ पुरावा आढळून न आल्याने त्यांनी सुरक्षारक्षकांना विचारपूस करायला सुरुवात केली. त्यांच्य असंबद्ध उत्तरांमुळे पोलिसांचा संशय बळावला होता. शिवाय, गुन्हा दाखल होताच सात जण फरार झाले. त्यामुळे पोलिसांनी यातील सहा जणांना हुडकून काढत अटक केली.