butibori bothali

वाहनचालकांना दिला नियमपालनाचा मूलमंत्र

बुटीबोरी : वाढती लोकसंख्या आणि जगण्याची स्पर्धा जीवघेणी ठरत आहे. गरजेपुरती धावपळ आवश्यक आहे. परंतु हव्यासासाठी माणूस स्वतःचे प्राण गमावत आहे. औद्योगिकीकरणामुळे गावातील लोकांचे शहराकडे स्थलांतरण आ. वाहनांची संख्या वाढली होत आहे. त्यामुळे रासत्यवरिल अपघातात कुणी दगावल्याची बातमी रोज कानावर पडते. मानवाच्या इतर गरजांप्रमाणे वाहन गरज बनले आहे.butbori

ayansh tvs

व्यक्तीचा संबंध जेव्हा प्रवासाशी येतो तेव्हा वाहन खासगी असेल, तर नियम पाळले गेले पाहिजे. बुटीबोरी व परिसरातील अपघातांचा आकडा बघितला, तर यातील शेकडो अपघात हे वाहन सुरक्षा नियमांच्या उल्लंघनामुळे झाल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकांनी रस्तासुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचा सल्ला वाहतूक विभागाने दिला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती नागपूर तथा वाहतूक विभाग नागपूर यांचा मार्गदर्शन सोहळा तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष, प्रभाग बोरखेडी फाटक, पं. स. नागपूरच्या वतीने मैत्री ग्रामसंघ कार्यालय बोरखेडी फाटक बोथली येथे पार पडला. याप्रसंगी वाहनचालकांची वाहतूक सुरक्षा आणि नियमांबद्दल कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वाहतूक विभाग नागपूरच्या निरीक्षिका स्नेहा मेंढे, रस्ता वाहतूक अधिकारी अर्चना घानेगावकर, नागपूरच्या डीएमएम प्रीती नागदिवे, जिल्हा अभियान व्यवस्थापक शेखर गजभिये, तालुका व्यवस्थापक रविकुमार ढाकणे, रोशन मेश्राम, चित्रा हनवते, दीपिका चौधरी उपस्थित होते. मान्यवरांनी अपघातपीडितांना सुवर्णघटिकेत कशा रीतीने वाचविले जाऊ शकते, मोटारसायकल वापरताना हेल्मेट वापरणे, चारचाकी चालविताना सीटबेल्ट वापरणे, मद्यपान करून वाहन न चालविणे, वाहन चालविताना फोनवर न बोलणे या चतुसूत्रीवर मार्गदर्शन केले. संचालन हंसा सूर्यवंशी व लक्ष्मी नारनवरे यांनी केले. आभार रोशन मेश्राम यांनी मानले.