ढोल ताश्याच्या गजरात साजरा झाला बुटीबोरी च्या राजा चा विसर्जन सोहळा.

बुटीचोरी: श्री गणेश बहुउद्देशीय संस्था द्वारा दरवर्षी बुटीचोरीचा राजा असा नावलौकिक मिळालेल्या श्रीगणेशाची स्थापना करण्यात येते दरम्यान १० दिवस विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतात. परिसरात एक प्रकारे जत्रेचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळते गणरायाच्या दर्शनाला बुटीबोरी तसेच आसपासच्या गावातील लोक येत असतात म्हणून १० ही दिवस परिसरात जनसागर पाहायला मिळतो.

त्याच बुटीबोरी च्या राजा ची विसर्जन मिरवणूक मोठमा थाटामाटात दिनांक-१९-०९ २०२४ रोज गुरुवारला सायंकाळी ५ वाजता माता मंदीर परिसरातून काढण्यात आली या मिरवणुकीत बुटीबोरीतील समस्त जण समुदाय सहभागी झाला होता. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या गजराने परिसर दणाणून सोडला होता. गुलालाची उधळण होत होती डील ताशाचा आवाजात गणेशाच्या गाण्यावर लोक नाचत होते.

एक भक्तिमय वातावरण पाहायला मिळत होत. चौकाचौकात समाजसेवी मंडळाकडून पाण्याची व सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. गणरायाची मिरवणूक पाहायला लाखोंच्या संख्येत जनसागर उसळला होता रस्त्याच्या दोन्ही कडेला लोकांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या काही काळ ट्राफिक सुद्धा जाम झाली होती पण लोकांना त्याची तक्रार नव्हती कारण मिरवणूक होती ती त्यांच्या लाडक्या बाप्पा ची मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बुटीबोरी पोलिसांची मिरवणुकीवर सत्क्ता नजर होती ते प्रत्येक घटनेवर पाडत ठेवून होते. मिरवणूक योग्परित्या पार पडल्याबद्दल श्री गणेश बहुउद्धेशीय संस्थेचे अध्यक्ष बल्लूभाऊ श्रीवास व मंडळाच्या सदस्यांनी बुटीबोरी वासीयांचे आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *