झोपलेल्या व्यक्तीची रक्कम पळविली

बुटीबोरी, २३ नोव्हेंबर
बँकेतून रोख रक्कम काढल्यानंतर एकाची प्रकृती बिघडली. म्हणून तो आराम करीत असतानाच त्याच्या खिशातील रोख रक्कम चोरांनी लंपास केली. ही घटना एमआयडीसी बुटीबोरी पोलिस स्टेशन अंतर्गत घडली.
प्रसेनजीत तपन खांगराई असे फिर्यादीचे नाव आहे. मोरारजी कंपनीत कार्यरत प्रसेनजीत खांगराई याने २२ नोव्हेंबर २०२२ रोजी सेंट्रल बँकेतून रोख २३ हजार रुपये काढले. पैसे त्यांनी व्यवस्थित ठेवले आणि तो मोरारजी कंपनीकडे जाण्यास निघाला. पण वाटेत त्याची प्रकृती बिघडल्याने तो शेडमध्ये आराम करीत होता. यावेळी त्याला झोप लागली अन् तेव्हाच अज्ञात चोराने घात करीत त्याच्या खिशातील रोख २३ हजार रुपये काढून नेले. जेव्हा प्रसेनजीत खांगराई झोपेतून उठला तेव्हा त्याला खिशात पैसे दिसले नाहीत. एवढी मोठी रक्कम काही क्षणात हातून गेल्याने ते हतबल झाले व त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *