ज्ञानदीप शाळेतील शिक्षक मनोज ठाकरे यांना मिळाली शाबासकीची थाप..

विद्यार्थ्यासह गुरूचा शाळेतर्फे सत्कार.

बुटीबोरी :- ज्ञानदीप शाळेच्या संचालक विनोद लोहकरे आणि मुख्याध्यापक वेदनारायण मोरवाल सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यासह गुरूचा उत्साहवर्धक सत्कार हा विशेष क्षण विद्यार्थ्यांसोबतच्या शिक्षणाच्या प्रवासात आज घडला.शाळेतील शिक्षकाने आपला शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्वपूर्ण कार्याचा गौरव मिळवला.शाळेतील छोटया छोटया विद्यार्थ्यानंकरिता नेहमीच कृतिशील कार्य करणारे व विद्यार्थ्यावर नावीन्य पूर्ण प्रयोग करणारे शाळेतील शिक्षक मनोज ठाकरे यांचा शाळेतर्फे कृतिशील शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला.


विद्यार्थ्याच्या पाठीवर नेहमीच कौतुकाची थाप देणारे,शाळेच्या वर्ग खोल्यात विद्यार्थ्यांवर नावीन्य पूर्ण प्रयोग करणाऱ्या मनोज ठाकरे यांनी २१ जानेवारीला सायंकाळी शाळेच्या प्रांगणात स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमातून चौथ्या वर्गातील दोन विद्यार्थ्यावर तब्बल २०१ प्रश्नाचे अचूक उत्तरे देण्याची जवाबदारी दिली.त्या करिता विद्यार्थ्यांचा वयोगट पाहता प्रश्नांची काठिण्य पातळी आकाशाला गवसणी घेणारी व मोठ्या विद्यार्थ्यांना सुद्धा न जमणारी होती.ज्यांची अचूक उत्तरे ५ मिनिटात आयुष भोयार व शौर्य शेलकर या दोन विद्यार्थ्यानी दिली.या दोन विद्यार्थ्या सह शिक्षकाचे सुद्धा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढविण्याकरिता नगराध्यक्ष बबलु गौतम यांनी दोघांना दोन लॅपटॉप देण्याची घोषणा केली तर मुख्याधिकारी राजेन्द्र चिखलखुंदे यांनी १० हजार रुपयाचे रोख बक्षीस चिमुकल्याना दिले.तर खापर्डे शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला लोहकरे मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यासह शिक्षकाचे भरभरून कौतुक केले.


या बाबीला हेरून ज्ञानदीप कॉन्व्हेंट व उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने शाळेचे संचालक विनोद लोहकरे व वेदनारायण मोरवाल (मुख्याध्यापक मराठी माध्यम) वंदना पानबुडे मॅडम (मुख्याध्यापिका इंग्रजी माध्यम) यांच्या उपस्थिती मध्ये मनोज ठाकरे यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
सत्कार समारंभात बोलताना मनोज ठाकरे यांनी सांगितले की,विद्यार्थ्यांशी असलेले नाते कायम राखणे हेच त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.हा मान,सन्मान माझ्यासाठी एक मोठा आदर्श ठेवा आहे आणि तो कृतिशील शिक्षक म्हणून मी सदैव आपल्या कार्याला चालना देण्याचा प्रयत्न करील.या सत्काराने मला प्रेरणा आणि उत्साह मिळाला असून,तो माझ्या कार्याला नवी दिशा देईल अशी अपेक्षा ही व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *