जागृती महिला समिती तर्फे महिला दिनाचे आयोजन
मनोरंजनात्मक खेळातून लुटला आनंद.

बुटीबोरी (नीतीन कुरई):- आजच्या घडीला स्री प्रत्येक क्षेत्रात उच्च कामगिरी बजावत आहे.स्त्रियांच्या कार्याची जाणीव,स्त्रियांचा सन्मान फक्त महिलादिना निमित्तच नव्हे तर संपूर्ण वर्षभर व्हायला पाहिजे.असे मत जागृती महिला समिती मधील सोनल अग्रवाल यांनी व्यक्त केले.
सिडको कॉलोनीतील जागृती महिला समिती यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कल्याण व जागरूकता संबंधीत कार्यक्रमाचे आयोजन सुरूच असते याच माध्यमातून ९ मार्च रविवारला सिडको कॉलनी येथे जागतिक महीला दिनाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी १३ सुवर्ण,११ रौप्य व ६ कांस्य पदक असे ३० पदक प्राप्त करणाऱ्या १० वर्षीय जलतरणपटू अवनीत कौर,सिडको कॉलनीतील ज्येष्ठ महिला बेबी कुरई,व सीमा सिंघानिया यांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले.विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.ज्यामध्ये महिलांचे एकल व सामूहिक नृत्य,वेषभूषा स्पर्धा व मनोरंजनात्मक खेळातून सर्वांनी मनसोक्तआनंद लुटला.स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

समितीच्या अध्यक्षा योगिता पनंपालिया यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले.श्रीमती ममता केडिया यांनी मुख्य अतिथी यांचा परिचय करून दिला.संचालन सोनल अग्रवाल व हरप्रीत कौर यांनी केले. कार्यक्रमाला,ममता केडिया,सोनल अग्रवाल,श्रध्दा राठी,आभा अग्रवाल,बेबी कुरई,सीमा सिंघानिया,शमशाद पठाण,निर्मला शर्मा,रजनी चांडक,गुंजन,ममता सारडा,नम्रता राठी,अर्चना सारडा,धनश्री मुंदडा,प्रिया राठी,कल्पना मुप्पाला,राजपूत काकू,उमा पालीवाल,आरती रायकर,मोनाली कुरई आणि परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थितांना भोजन ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.