अज्ञात कारणावरून तरुणाची आत्महत्या

टाकळघाट येथील घटना, विहिरीत आढळला मृतदेह

बुटीबोरी, वार्ताहर. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या किरणा व्यवसायिक तरुणाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. ही घटना एमआयडीसी बोरी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या टाकळघाट शिवारात सोमवारी (दि. 3) सकाळी 8 वाजताचे सुमारास उघडकीस आली.

मनोज सेवकराम उमाटे (35) रा.वार्ड क्र.1 टाकळघाट, ता. हिंगणा, जिल्हा नागपूर असे घटनेतील मृतकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार सदर घटनेतील मृतक नामे मनोज यांचे टाकळघाट येथे किराणा दुकान होते. ते शनिवारपासून (दि.1) बेपत्ता असल्याची नोंद एमआयडीसी बोरी पोलिस ठाण्यात होती.

पोलिस त्यांच्या तपासकामी असताना घटनादिनी त्यांना टाकळघाट येथील पोलिस पाटील विलास डायरे यांचा फोन आला की विक्तू बाबा मंदिर परिसरातील एका सरकारी विहिरीत एका इसमाचा मृतदेह दिसून आला. सदर घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी बोरी ठाण्याचे एएसआय संजय इंगोले,

पोहवा नामदेव दोडके तसेच पोशी दत्तात्रय नाईकवाडे यांनी घटनास्थळ गाठले. गावातील काही सहकाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला आणि उत्तरीय तपासणी करिता रवाना केला.

मृतकाला दारूचे व्यसन

सदर घटनेतील फिर्यादी नामे सूरज राजू नागपुरे (25) रा.वार्ड क्र.5 नवीन वसाहत बुटीबोरी जिल्हा नागपूर हा मृतकाचा भाचा असून त्यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या बयानानुसार मनोज यास दारूचे व्यसन होते. त्यामुळे ते आपल्या किराणा दुकानात लक्ष घालत नव्हते. यातून घटनेच्या तीन दिवसांपूर्वी फिर्यादीचे मोठे मामा गणेश यांनी मनोज यास हटकले असता त्यांचा शाब्दिक वाद झाला. त्यानंतर ते वेपत्ता झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *