बालाजी कान्वेंट मधील विद्यार्थ्यानी साधला जर्मनीतील दूतावासाशी संवाद

बुटीबोरी :- देशभर साजरा करण्यात येत असलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून,राज्यातील शाळांसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मार्गदर्शनपर ‘ग्लोबल महाराष्ट्र’ हा उपक्रम सकाळ माध्यम समूह,जर्मनीतील भारतीय वाणिज्य दूतावास येथे कार्यरत असलेले मराठी अधिकारी डॉ.सुयश यशवंतराव चव्हाण व महाराष्ट्र मंडळ – म्युनिक यांच्या संयुक्त प्रयत्नाने ही कार्य शाळा संपन्न झाली.

ayansh tvs butibori


जर्मन भाषा आणि संस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच विन्याच्या उद्देशाने आज दिनांक २३ मार्च रोजी आयोजित कार्य शाळेच्या माध्यमातून बालाजी कॉन्व्हेन्ट मधील विद्यार्थांनी साधला जर्मनीतील दूतावास यांच्याशी संवाद
वर्ग ७,८,आणि ९ तील विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापिका जयश्री टाले,मुख्याध्यापक निखिल साबळे,शिक्षक अजय गुरनुले व नितिन कुरई सर प्रामुख्याने उपस्थित होते.


राज्यातील तब्बल १००० शाळेतील असंख्य विध्यार्थी या कार्यशाळेचा अनुभव घेतला.
सकाळचे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद पिसाळ,डॉ. सुयश यशवंतराव चव्हाण ,जर्मनीतील भारतीय परराष्ट्र सेवेतील मराठी अधिकारी तसेच भरता मधून ग्रामीण भागातून आपला शैक्षणिक अनुभव घेऊन जर्मनी मध्ये स्थाइक झालेल्या अनेकांनी आपले अनुभव व्यक्त केले.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरजू  विदयार्थ्यांना परदेशातील शिक्षणाच्या संधींची योग्य माहिती मिळावी हा एकमेव उद्देश ठेवण्यात आला होता.विद्यार्थ्यांना जागतिक संधी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास तयार करणे.विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये असलेल्या शैक्षणिक आणि करियर संधी बद्दल जागरूक करणे,करिअर मार्गदर्शनासाठी लागणारे गाईडन्स,अनुभव,माहिती या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना देणे.या बाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.butibori