स्ट्रीट लाईट लोकार्पण सोहळा

बुटीबोरी– राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते ग्रामपंचायत टाकळघाट अंतर्गत विक्तूबाबा ते अमर हायस्कूल व एमआयडीसी ते टाकळघाटपर्यंत रस्ता दुभाजकामध्ये स्ट्रीट लाईट कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.

टाकळघाट ग्रामपंचायत अंतर्गत विक्तूबाबा प्रतिष्ठान ते इंडोरामा कामगार वसाहतपर्यंत दुपदरी | सिमेंट रोडचे काम झाले आहे. तर खापरी चौरस्ता ते विक्तूबाबा प्रतिष्ठानपर्यंत रस्ता दुभाजक लागलेले आहे.

या रस्ता दुभाजकामध्ये स्ट्रीट लाईट लागावे म्हणून ग्रा.पं. सरपंच शारदा शिंगारे ह्या सतत प्रयत्नरत होत्या. अखेर त्यांनी आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवत ग्रा.पं.च्या १५ वित्त आयोग मधून स्ट्रीट लाईटकरीता निधी उपलब्ध करून विक्तूबाबा प्रतिष्ठान ते अमर हायस्कूल व एमआयडीसी ते टाकळघाटपर्यंत दुभाजकामध्ये दोन पंख्याचे एलईडी स्ट्रीट लाईट लावण्याचे सुशोभीकरण व करण्याचे काम पूर्णत्वास आले. याच स्ट्रीट लाईट कामाचा लोकार्पण सोहळा राज्याचे यांच्या हस्ते पडला.

यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय घोडमारे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार नाना श्यामकुळे, हिंगणा पं. स. सभापती सुषमा कडू, माजी जि. प. सदस्य हिंगणा रत्नमाला इरपाते, माजी सरपंच चंपत कावळे, विविध सहकारी सोसायटी अध्यक्ष रामदास पुंड, श्यामबाबू गोमासे, संजय नवघरे, ग्रा.पं. सदस्य मनोज जीवने, वर्षा डायरे, राजश्री पुंड, बबिता बहादुरे, सतीश कोल्हे,

सुधा लोखंडे, उमेश कावळे, वनिता चटप, रंजना झाडे, सुनंदा ठाकरे, चंचल सिंग, सुनीता खोडे, देवानंद इरपाते, ममता इंगोले, नरेंद्र येसनसुरे, चंद्रमोहन मरकाम, नाना शिंगारे, माजी सरपंच नीलकंठ कावळे, प्रभाकर चटप, वेदांत वासाड, योगेश कोठेकर आदी उपस्थित हाते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दिलीप मुठे, प्रास्ताविक सरपंच रस्ता शारदा शिंगारे तर आभार उपसरपंच नरेश नरड यांनी मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *