बुटीबोरी पोलिसांची कारवाई : वाहनांसह मुद्देमाल जप्त

नागपूर, स्थानिक पोलिसांनी बुधवारी (दि.29) गस्तीदरम्यान उमरेड-बुटीबोरी मार्गावर विनापरवना रेती भरलेले टिप्पर येत असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळाली. पोलिसांनी देवळीगुजर गावाजवळ नाकाबंदी केली असताना टिप्पर वाहन क्रमांक एमएच 40 एके 5970 चालक कृष्णा हिराचंद महाजन (33) रा. नवेगाव (पालेपाट) ता. पवनी, जि. भंडारा, टिप्पर वाहन क्रमांक एमएच 36 एए 3752 चा चालक तुषार चुटे (21) रा. सिर्सी. ता. उमरेड, टिप्पर वाहन क्रमांक एमएच 40 बीएफ 4311 चालक प्रदीप कैकाडे (37) रा. तास, ता. भिवापूर,

टिप्पर क्रमांक एमएच 40 बीएल 5604 चा चालक रंजित शहारे (38) रा. तांबेखणी ता उमरेड, टिप्पर क्रमांक एमएच 40 सीटी 5456 चा चालक संदीप वावरे (36) रा. तास, ता. भिवापूर यांना थांबवून पथकाने पाहणी केली असता सर्व पाचही वाहनांमध्ये एकूण अंदाजे 33 ब्रास रेती मिळून आली. सदर वाहन चालकांना ताब्यातील टिप्परमधील रेतीच्या रॉयल्टीबाबत विचारणा केली असताना रॉयल्टी नसल्याचे सांगितले.

रेती चोरीची असल्याची खात्री झाल्यानंतर टिप्पर मालक व चालकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पाचही टिप्परची अंदाजे किंमत 1,86,00,000 आणि 33 ब्रास रेतीची किंमत 3,41,000 असा एकूण 1,89,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक व टिप्पर मालकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.